Wed, Jul 17, 2019 21:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ३० जानेवारीला माथाडी कामगारांचा महाराष्ट्र बंद

३० जानेवारीला माथाडी कामगारांचा महाराष्ट्र बंद

Published On: Jan 25 2018 5:02PM | Last Updated: Jan 25 2018 5:02PMनवी मुंबई : प्रतिनिधी 

राज्य सरकारने माथाडी बोर्डासह इतर ३९ बोर्ड एकत्र करून संयुक्‍तपणे एकच बोर्ड तयार करण्याचा निर्णय घेत आहे. माथाडी बोर्डाचे सर्व अधिकारी काढून माथाडी कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला. याला विरोध करण्यासाठी आणि  माथाडी कायदा जिवंत ठेवण्यासाठी ३० जानेवारीला महाराष्ट्र बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. एपीएमसीत आज दुपारी झालेल्या माथाडी कामगार संघटनांच्या बैठकीत  बंदचा निर्णय झाल्याची माहिती आमदार व माथाडी नेते शशिकांत शिंदे यांनी पुढारीशी बोलताना दिली. 

यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले, माथाडी कार्यरत असलेले सर्व उद्योग ३० जानेवारीला बंद राहणार आहेत. सरकार तर्फे माथाडी कायदा मोडीत काढण्याचा डाव रचण्यात आला आहे.  राज्यातील सर्व माथाडी संघटना एकत्रित आले असून सरकारला सडेतोड उत्तर देण्यात येणार आहे. नवी मुंबई एपीएमसी मध्ये झालेल्या माथाडी कृती समितीच्या बैठकीत हा महत्वपूर्ण  निर्णय घेण्यात आला. बैठकीला माथाडी नेते शशिकांत शिंदे, बाबा आढाव, अविनाश रामीष्टे आदी उपस्थित होते.