Sat, Jul 20, 2019 08:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्य सूत्रधार शैगी ठक्करला जामीन मंजूर

मुख्य सूत्रधार शैगी ठक्करला जामीन मंजूर

Published On: Jun 19 2018 1:31AM | Last Updated: Jun 19 2018 12:59AMठाणे : प्रतिनिधी

मीरा रोड बोगस कॉल सेंटरचा 24 वर्षीय मास्टर माईंड सागर ऊर्फ शैगी ठक्कर यास ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जामीन मिळावा म्हणून शैगी प्रयत्न करत होता. त्याच्या वकिलांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून हजारो अमेरिकन नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी शैगीला ठाणे गुन्हे शाखेने मागील वर्षी अटक केली होती.

ब्युरो ऑफ इमिग्रेशन पथकाने 7 एप्रिल 2017 रोजी शैगीला मुंबईच्या सीएसआय विमानतळावर अटक केली होती. 8 एप्रिल 2017 रोजी ठाणे क्राईम ब्रांच युनिट एक कडून शैगीचा ताबा घेण्यात आला. तेव्हापासून तो तुरुंगातच होता. दरम्यान, शैगीवर एकूण तीन गुन्हे दाखल झाले होते.