Thu, Jan 17, 2019 21:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शहीद कौस्तुभ राणेंना अनुज्ञेय रक्कम मंजूर

शहीद कौस्तुभ राणेंना अनुज्ञेय रक्कम मंजूर

Published On: Aug 25 2018 1:40AM | Last Updated: Aug 25 2018 1:38AMमुंबई: विशेष प्रतिनिधी 

पाकीस्तानी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मिरा रोडचे सुपुत्र मेजर प्रकाश राणे यांना राज्य सरकारकडून देण्यात येणारी 6 लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. ती त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपर्द करण्यात येणार आहे. 

मेजर कौस्तुभ राणे यांना 26 जानेवारी 2018 रोजी राष्ट्रपती सचिवालयामार्फत सेना पदक प्रदान करण्यात आले आहे. त्यांना एकूण 6 लाख रुपये इतके अनुदान देण्यात येणार असून यापैकी महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत अनुज्ञेय ठरविलेल्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम म्हणजेच 4 लाख 50 हजार रुपये शासकीय अनुदानातून आणि 25 टक्के रक्कम म्हणजे 1 लाख 50 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून देण्यात येणार आहे. ही रक्कम ठाणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.