Fri, Jan 18, 2019 03:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत विवाहितेची आत्महत्या

भिवंडीत विवाहितेची आत्महत्या

Published On: Jul 30 2018 1:30AM | Last Updated: Jul 30 2018 1:04AMभिवंडी : वार्ताहर

विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची घटना भिवंडीतील नागाव परिसरातील फातमानगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी नवर्‍यासह सासू व फुफाला शांतीनगर पोलिसांनी अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. नवरा मोह. सामिम कलीम शेख (25), सासू शहाजॉहा (45), फुफा दिलदार उर्फ मोहम्मद अयुब शेख (30) अशी आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मृत रिजवाना (22) उत्तर प्रदेशमधील रायबरेली जिल्ह्यातील सलोन या गावातील राहणारी होती. रिजवानाचा भिवंडी शहरातील फातमानगर येथे राहणार्‍या मोह. सामिम याच्यासोबत दीड वर्षांपूर्वी निकाह झाला होता. त्यानंतर गेल्या 7 महिन्यापासून ती सासरी येऊन राहत होती. दरम्यानच्या काळात क्षुल्लक कारणावरून पती व सासू तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करीत होते. त्यांच्या छळवादाला वैतागून रिजवानाने घरातील बाथरूममध्ये जाऊन स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये ती 80 टक्के भाजली होती. 

सासरच्या मंडळींनी तिला भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला नवी मुंबईतील बर्न रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.