Sun, Mar 24, 2019 08:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › परेवर आज, तर मरे, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

परेवर आज, तर मरे, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

Published On: Feb 24 2018 1:36AM | Last Updated: Feb 24 2018 1:07AMमुंबई : प्रतिनिधी 

मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी सकाळी 11 ते दुपारी 4 आणि पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा लागणार आहे.  

मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे अप स्लो मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये कल्याणहून सुटणार्‍या अप स्लो/सेमी फास्ट मार्गावरील सेवा सकाळी 10.48 ते दुपारी 4.15 पर्यंत कल्याण ते मुलुंडपर्यंत फास्ट मार्गावर चालवण्यात येणार आहेत. त्यानंतर त्या अप स्लो मार्गावर चालतील. सीएसएमटीच्या दिशेने जाणार्‍या सर्व फास्ट लोकल सकाळी 10.05 ते दुपारी 2.54 कालावधीत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकात थांबतील. कल्याणहून सुटणार्‍या अप फास्ट लोकल सकाळी 11.23 ते दुपारी 4.02 कालावधीत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकात थांबतील. सीएसएमटीच्या दिशेने धावणार्‍या सर्व लोकल सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत किमान 10 मिनिटे उशीराने धावतील. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री 12.30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत वसई ते भाईंदर ब्लॉक घेतला जाणार आहे.