Fri, Jul 19, 2019 01:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीत मराठीला गुजराती ठरतेय डोईजड

डोंबिवलीत मराठीला गुजराती ठरतेय डोईजड

Published On: Mar 05 2018 8:50PM | Last Updated: Mar 05 2018 8:50PMडोंबिवली : वार्ताहर

सुशिक्षितांचे सांस्कृतिक शहर म्हूणन ओळखल्या जाणाऱ्या मराठी बहुल डोंबिवलीत पुन्हा एकदा मराठी-अमराठी वाद उभा ठाकला आहे. याच डोंबिवलीत मराठीसह इतर भाषिक सण सुध्दा साजरे केले जातात. मात्र, दुकानावरील पाट्या असो किंवा इमारतींना दिलेली नावेही मराठीमध्ये असतात. याला देसलेपाड्यातली एक सोसायटी अपवाद ठरली आहे. या इमारतीला चक्क गुजराथी भाषेमध्ये नाव दिल्याने मराठी भाषेचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

गुजराती पाट्यांविरोधात मनसेने मध्यंतरी केलेल्या आंदोलनादरम्यान मनसैनिकांनी मुंबईतील दुकानांच्या बोर्डाच्या पाट्या हटवल्या. त्यावेळी मनसेने गुजराती पाट्यांविरोधात खळखट्याक आंदोलन करून दुकानांवर असणाऱ्या गुजराती पाट्या हटवल्या. तर काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीवरुन नाराजी व्यक्त केली होती. तसेच लोकराज्य मासिक हिंदी आणि गुजराती भाषेतून काढण्यासही विरोध दर्शवला होता. त्यांनी राज्य सरकारचा एक जीआर वाचून दाखवला होता. ज्यामध्ये लोकराज्य मासिक हिंदी आणि गुजरातीमध्ये काढण्याची राज्य सरकारची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. हिंदी आणि गुजराती भाषिकांसाठी हे मासिक काढण्यात येण्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी चांगलेच खडे बोल सुनावले होते. या घटना ताज्या असतानाच डोंबिवलीतही मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

डोंबिवली जवळच्या देसलेपाड्यात उभारण्यात आलेल्या नवनीतनगर या गृहसंकुलाच्या इमारतीला चक्क गुजराती भाषेत नाव दिले आहे. याबाबत स्थानिक लोकांनी सांगितले की, ‘‘याकडे कोणीच लक्ष देत नाही. महाराष्ट्र राज्यात मराठीचा वापर झाला पाहिजे. पण तसे येथे होताना दिसत नाही. आता याकडे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष काय भूमिका घेतात, हे पाहणे गरजेचे आहे.’’