होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात मोठा पोलिस बंदोबस्‍त

ठाण्यात मोठा पोलिस बंदोबस्‍त

Published On: Aug 09 2018 11:30AM | Last Updated: Aug 09 2018 11:25AMठाणे : प्रतिनिधी 

ठाण्यात बंद नसल्याची घोषणा ठाण्यातील मराठा समाजाच्या समन्वयकांकडून काल करण्यात आली असली तरी, बंदचा काही प्रमाणात परिणाम ठाण्यात दिसून आला. मागच्या आंदोलनाचा अनुभव घेता शहरात चौका-चौकात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे शहरातील जवळपास सर्वच शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. ठाणे परिवहन सेवेच्या बसेस सकाळपासून बाहेर पडलेल्या असल्या तरी एसटी सेवा मात्र सकाळी १० पर्यंत बंद होती. खोपट आणि वंदना या एसटी डेपोमधून सकाळी १० पर्यंत एकही एसटी बाहेर पडली नाही. या डेपोंमध्ये प्रवासीदेखील बसल्याने शुकशुकाट पाहायला मिळाला. मागच्या आंदोलनामध्ये नितीन कंपनी परिसरात आंदोलन पेटले होते, त्यामुळे पोलिसांना लाठीचार्जदेखील करावा लागला होता. त्‍यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळी साडेआठ नंतर कळवा पुलावर मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी आज मात्र पाहायला मिळाली नाही. फार कमी प्रमाणात खासगी वाहने रस्यावर उतरली होती. कळवा नाक्यावरदेखील पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक घटना घडल्या असल्या तरी ठाण्यात एकंदर वातावरण शांत पाहायला मिळाले.