Sun, May 19, 2019 22:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई बंद : कल्याणमध्ये मराठ्यांचा एल्गार 

मुंबई बंद : कल्याणमध्ये मराठ्यांचा एल्गार 

Published On: Jul 25 2018 10:47AM | Last Updated: Jul 25 2018 11:41AMडोंबिवली : वार्ताहर

मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांतर्फे बुधवारी सकाळपासून कल्याणच्या स्टेशन परिसर बंद करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाचे अनेक कार्यकर्ते स्टेशन परिसरात दाखल झाले. आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा' घोषणेने परिसर दणाणून सोडला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या मुंबई बंदच्या पार्श्वभूमीवर कल्याणातील काही शाळांनी सुट्टी जाहीर केली. तर काही लवकर सोडण्यात आल्या. कल्याणातील प्रमूख चौकात रिक्षा वाहतूक, केडीएमटी बस वाहतूक मात्र सुरूच होती. खबरदारीचा उपाय म्हणून चौकाचौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि आसपासच्या परिसरातील दुकाने, हॉटेल बंद ठेवण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक शिवाजी महाराज चौकात जमा होऊ लागले आणि थोड्याच वेळात  मोर्चाला सुरुवात झाली.