Thu, May 23, 2019 14:28
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विशेष अधिवेशन होणार; मराठा समाजाने टोकाची भूमिका घेऊ नये: मुख्यमंत्री

विशेष अधिवेशन होणार; मराठा समाजाने टोकाची भूमिका घेऊ नये: मुख्यमंत्री

Published On: Jul 28 2018 5:31PM | Last Updated: Jul 28 2018 6:21PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईत आज सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत गेल्या काही दिवसात झालेल्या मराठा आंदोलनासंदर्भात चर्चा झाली. विरोधीपक्षांनी यावर चर्चा करण्यासाठी  विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. त्यावर राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतरच मराठा आंदोलनावर विशेष अधिवेशन घेणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

मुंबईत शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. तसेच मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी विखे-पाटील यांनी केली. मात्र ठोक मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची तयारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पण गंभीर गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. 

Image may contain: text

बैठकीनंतर काय म्हणाले मुख्यमंत्री...

मराठा आरक्षणासंदर्भात अधिवेशन घेण्यासंदर्भात सर्वांचे एकमत
आरक्षणाला विरोधी पक्षांचा देखील पाठिंबा
राज्य मागासवर्ग आयोगाला लवकरात लवकर अहवाल देण्यास सांगितले
आंदोलन करू नका, हिंसाचार करू नका- मुख्यमंत्री
न्यायालयात टिकेल असे आरक्षण मिळवून द्यायचे आहे
मागच्या वेळी ज्या त्रुटी राहिल्या त्या दूर करायच्या आहेत
पोलिसांवर हल्ले, दगडफेक केली असल्यास गुन्हा दाखल होणार
मेगाभरती झाली तरी मराठ्यांच्यासाठीच्या जागा अन्य कोणालाही दिल्या जाणार नाहीत