Tue, Mar 19, 2019 15:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबईत कडकडीत बंद 

नवी मुंबईत कडकडीत बंद 

Published On: Jul 25 2018 11:28AM | Last Updated: Jul 25 2018 11:28AM
नवी मुंबई : प्रतिनिधी 
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नवी मुंबई, पनवेल, उरण, कंळबोली, कामोठे, खारघरमध्ये आज बंद पाळण्यात येत आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 
एपीएमसी घाऊक बाजारातील फळ आणि भाजीपाला मार्केट वगळता तीनही मार्केट बंद ठेवण्यात आले आहेत. महापालिका परिवहन विभागाने एसी ६७ बसेस आगारात उभ्या करून ठेवल्या आहेत. सीबीडी सीजीओ, आरबीआय बॅकेसह इतर कार्यालयांबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात केला  आहे.    
नवी मुंबईतील कोपरखैरणे  भागात आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरल्याने कोपरखैरणे वाशी दरम्यानची वाहतूक बंद झाली होती. वाशी रेल्वे स्थानकाच्या परिसरात बंद ठेवण्यात आला आहे. रिक्षा स्टॅंडवर तुरळक प्रमाणात रिक्षा दिसून येत आहेत. सकाळच्या सत्रात मुंबईत भाजीपाल्याच्या २१० गाड्या रवाना करण्यात आल्या. पेट्रोल पंपावर हातची असलेली वाहनांची गर्दी तुरळक प्रमाणात दिसून येत आहे.