Thu, Jul 16, 2020 08:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आरक्षण तातडीने निकाली काढा : हायकोर्ट

मराठा आरक्षण तातडीने निकाली काढा : हायकोर्ट

Published On: Dec 21 2017 8:06PM | Last Updated: Dec 21 2017 8:06PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

गेल्या अडीच वर्षांपासून उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तातडीने निकालात काढावा, राज्य आणि मागासवर्गीय आयोगाला वेळेचे बंधन घालून येत्या शैक्षणिक वर्षापूर्वी निर्णय घेण्याचे निर्देश द्या, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि राजेश केतकर यांच्या खंडपीठाने दखल घेऊन याचिकेची सुनावणी नाताळ सुट्टीनंतर ३१ जानेवारीला घेण्याचे निश्‍चित केले आहे.

आर. आर. पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांच्या वतीने अ‍ॅड. विजय किल्लेदार व अ‍ॅड. सुशील इनामदार यांनी ही याचिका न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि राजेश केतकर यांच्या खंडपीठाच्या आज निदर्शनास आणून दिली. गेली अडीच वर्षे मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. 

उच्च न्यायालयात या याचिकांवर सुनावणी सुरू असताना राज्य सरकारने मराठा हा समाज आरक्षणाच्या दृष्टीने मागासर्गीयांमध्ये मोडतो का नाही, याचा फैसला करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती एस. बी. म्हसे यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाची स्थापना केली. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आयोगाकडे सोपविण्यात आला. मात्र, गेल्या वर्षभरात या आयोगाकडून अहवाल सादर केला नसल्याने आयोगाला आणखी मुदतवाढ देण्यात आली. मराठा आरक्षणासंदर्भात कोणताही ठोस निर्णय झालेला  नसल्याने आयोगाला वेळेचे बंधन घालून, येत्या शर्थणिक वर्षापूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.