Wed, Jun 26, 2019 17:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्या मुंबईसह ठाणे, रायगड, कल्याण बंदची हाक

उद्या मुंबईसह ठाणे, रायगड, कल्याण बंदची हाक

Published On: Jul 24 2018 4:23PM | Last Updated: Jul 24 2018 4:23PMकल्याण : प्रतिनिधी  

मराठा समाजाच्या वतीने उद्या मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर, कल्याण बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा मोर्चा समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
आज मुंबई, ठाणेसह इतर जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात आज बंद पाळण्यात येत आहे. मात्र उद्या बुधवारी या ठिकाणीही बंद पुकारला आहे.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसह काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ उद्या कल्याण बंदची हाक सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली. 
आज कल्याणमधील सकल मराठा समाज महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झाला नाही. उद्या कल्याणमध्ये होणाऱ्या मोर्चातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. उद्याचा बंद हा अत्यंत शांततेच्या मार्गाने केला जाणार असून त्यामध्ये कल्याण डोंबिवलीसह दिवा, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर, विरार आदी ठिकाणचे मराठा बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या बैठकीत सांगण्यात आले आहे. 

तसेच मराठा समाजासाठी काम न केलेले खासदार, आमदार यांचा निषेध करण्यात येणार आहे. या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी औरंगाबाद येथे आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीला धनंजय जोगदंड, सोमनाथ सावंत, अरविंद मोरे, शाम आवारे, अनिल डेरे, प्रशांत काळे, हर्षवर्धन पालांडे, प्रशांत शिंदे, संदीप देसाई, दर्शन देशमुख, शरद पाटील यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.