होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा संघटनांकडून आज महाराष्ट्र बंदची हाक!

मराठा संघटनांकडून आज महाराष्ट्र बंदची हाक!

Published On: Jul 23 2018 9:36PM | Last Updated: Jul 23 2018 9:45PMमुंबई:  पुढारी ऑनलाईन

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना औरंगाबादमधील एका युवकाच्या मृत्यूनंतर मराठा संघटनांनी आज (मंगळवारी) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पण बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. तसेच बसवर दगडफेक न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

औरंगाबादमधील कायगांव येथे गोदावरीत आंदोलनकर्त्यांनी सोमवारी सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनादरम्यान काकासाहेब दत्तात्रय शिंदे या युवकाने गोदावरी नदीत उडी घेतली. पण वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यातील अनेक ठिकाणी आज (मंगळवारी) बंदचे आवाहन केले आहे.  

दरम्यान, काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. मराठा संघटनांनी या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.