Thu, Apr 25, 2019 21:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बुधवारी महाराष्ट्र बंद; नवी मुंबई आणि पनवेलचाही सहभाग

बुधवारी महाराष्ट्र बंद; नवी मुंबई आणि पनवेलचाही सहभाग

Published On: Jul 24 2018 9:55AM | Last Updated: Jul 24 2018 5:40PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

औरंगाबाद मध्ये काकासाहेब शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्यानंतर आता राज्यात असंतोषाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणात आंदोलनाला सुरवात झाली आहे. मंगळवारी संपूर्ण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात याचे पडसाद उमटले आहेत. दरम्यान, कालच आषाढी वारी संपल्याने पंढरपूरवरून आपल्या घरांकडे निघालेल्या वारकर्‍यांना कोणताही ञास होवू नये यासाठी पश्चिम महाराष्ट्र, नवी मुंबई , मुंबई भागातील मराठा समाजाने बंद आंदोलनात सहभाग घेतला नव्हता.

बुधवारी उरवरीत महाराष्ट्र बंद करण्यात येणार आहे. वाशी मधील माथाडी भवन मध्ये मंगळवारी सकाळी मराठा संघटन समन्वयकांची बैठक पार पडली. या बैठकीत बुधवारी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई, मुंबई, रायगड, ठाणे आदी भागातील मराठा समन्वयक प्रतिनिधी या बैठकीला हजर होते. काकासाबेह शिंद यांना श्रध्दांजली अर्पण करून बैठक सुरू करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र सरकार कोणत्याही प्रकारे मराठा बांधवांच्या मागण्या त्वतीर पुर्ण करीत नसल्याचा आरोप करण्यात आला. त्याच बरोबर जे निर्णय राज्य सरकारने मराठा समाजासाठी घेतले आहेत ते प्रत्यक्षात उतरले नसल्याने कोणत्याही प्रकारचा फायदा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आणि तरूणांना होत नसल्याचा आरोप केला गेला आहे. काकासाहेब शिंदे यांच्या आत्महत्येला राज्य सरकार जबाबदार आहे.

सोमवारी आषाढी एकादशी असल्याने मंगळवारी पंढरपुरात गेलेले लाखो वारकरी आपल्या गावाकडे जात असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचा ञास होवू नये यासाठी बंद आंदोलन न करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. माञ बुधवारी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून एस टी गाड्यांवर दगडफेक न करण्याचे आवाहन आंदोलन कर्त्यांना करण्यात आले आहे. दरम्यान बुधवारच्या महाराष्ट्र बंद मध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडचा समावेश आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकर्‍यांचे नुकसान होवू नये यासाठी भाजीपाला आणि फळ मार्केटला बंद मधून वगळण्यात आले आहे. नवी मुंबई पार पडलेल्या बैठकीला माथाडी नेते नरेंद्र पाटील, अंकूश कदम, प्राची पाटील, राहूल पवार आदी समन्वय उपस्थित होते.

वाचा : लातुरात मराठा क्रांती मोर्चातील युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Live Update : 

औरंगाबाद : काकासाहेब शिंदेवर कायगाव टोकात अत्यंसंस्कार

सांगली : लेंगरेत मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला हिंसक वळण; एस टी बस फोडली 

मुंबई : मराठा आरक्षण, वारीबाबत मराठा समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, मेगा नोकरभरती आरक्षणापर्यंत स्थगित करा

नाशिक : मराठा समाजास आरक्षण व विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंनदोलनात कळवण शहरात कडकडीत बंद

सांगली : मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्‍ट्र बंदला पाठिंबा म्‍हणून तासगाव तालुक्यात कडकडीत बंद

सकल मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा म्हणून तासगाव तालुक्यात कडकडीत बंद पाळला. तासगाव शहर आरवडे, मांजर्डे,  विसापूर, पेड, सावळज, येळावी, कवठेएकंद, कुमठे यासह ग्रामीण भागातील व्यापारी आणि दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून पाठिंबा दर्शविला. 

मुंबई मराठा आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी दादर शिवाजी मंदिर येथे बैठकीला सुरवात

बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाचा ठराव. वारीबद्दल मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने मराठा समाज दुखावला

नांदेड : आंदोलनाला हिंसक वळण, तरोडा भागात दगडफेक, पोलिस कर्मचाऱ्यास काहीजण जखमी

नांदेड : आंदोलकांनी पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या गाडीच्या काचा फोडल्या

आंदोलनादरम्यान साताऱ्यात एस.टी.वर दगडफेक

अहमदनगर : महाराष्ट्र बंदला संगमनेरमध्ये हिंसक वळण

*अनुचीत प्रकार टाळण्यासाठी औरंगाबादमधील इंटरनेट सेवा बंद 

*चिपळूणमध्ये महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद; कडकडीत बंद 

*औरंगाबादेत महाराष्ट्र बंदला हिंसक वळण; अग्निशमन दलाची गाडी जाळली  

*मराठा आरक्षण मागणी; बारामतीत प्रशासकीय इमारतीवर दगडफेक 

सातारा :

फलटणमध्ये कडकडीत बंद

आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या युवकाने जलसमाधी घेऊन सरकारचा निषेध केला होता. शहरामध्ये शिंदे यांना श्रद्धांजली वाहून फलटण मध्ये मोर्चा काढून कडकडीत बंद पाळण्यात आला.

 

वाचा : मराठा आरक्षणासाठी वाईत कडकडीत बंद (Video)

मराठा आरक्षणासाठी वाईत कडकडीत बंद 

राज्यात मराठा आरक्षणसाठी मराठा संघटनांनी एक मराठा लाख मराठाचा पुन्हा एल्गार केला आहे. सोमवारी आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे यांनी  थेट जलसमाधी घेऊन आपले जीवन संपवले. याच घटनेचे पडसाद राज्यात उमटले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात मराठा बांधव पेटून उठला आहे. मंगळवारी सातारा जिल्हा स्वयंस्फुर्तीने बंद करण्यात आला.

सोलापूर : महाराष्ट्र बंदचे पडसाद सोलापुरात दिसून आले. येथे कडकडीत बंद आहे.

बोंडले येथे स्वयंस्फूर्तीने बंद

बोंडले (जि. सोलापूर) : प्रतिनिधी
मराठा संघटनांनी आज (मंगळवारी) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आळंदी पंढरपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ वरती पालखी मार्गावरील मुख्य गाव असलेल्या बोंडले (ता.माळशिरस) येथे आज स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद आहेत.

दरम्यान, काल आषाढी एकादशी असल्यामुळे एकादशीसाठी गेलेले लाखो वारकरी व त्यांची वाहने परतीच्या प्रवासासाठी निघाली आहेत. हजारो वाहने या मार्गावरुन जात आहेत. त्यामुळे या मार्गावरती वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणावरती दिसून येत आहे.

वेळापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कोरके,  सदाशिव जगताप, एस.पी. रेगुडे व लक्ष्मण पिंगळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत.

वैरागमध्येही कडकडीत बंद 
शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. वैरागकारांचा बंदमध्ये उस्फुर्त सहभाग दिसत आहे .येथील छत्रपती शिवाजी चौकात शाहिद काकासाहेब शिंदे यांना सर्व समाज्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहून  सरकारचा निषेध करण्यात आला.

 

मराठवाडा : घनसावंगी (जि. जालना) येथे आंदोलनाला हिंसक वळण  

मराठवाडा : प्रतिनिधी
घनसावंगी (जि. जालना) मराठा आंदोलनास हिंसक वळण लागले. पोलिस ठाणे व तहसील कार्यालयावर दगडफेक, अग्निशमन दलाच्या वाहनासह ३ मोटर सायकली जाळल्या.  पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला.

चिपळूण व गुहागरमध्ये आंदोलनाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद 

गिमवी (रत्‍नागिरी) : वार्ताहर 

मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवरून काकासाहेब शिंदे या तरुणाने घेतलेल्या जलसमाधीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या विरोधात पुकारलेल्या बंदमध्ये उत्तर रत्नागिरी जिल्‍ह्‍यातील गुहागर चिपळूण भाग सहभागी झाला. 

काल काकासाहेब शिंदे या मराठा तरुणाने आरक्षण मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीमध्ये उडी मारून जलसमाधी घेतली. या आत्महत्येला सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप करत सरकारच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला चिपळूण व गुहागरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण ठिकाणी कडकडीत बंद पाळला जात आहे. तर गुहागर तालुक्यातील शुंगारतळी येथे काही काळ गुहागर-विजापूर हा रस्ता रोखण्यात आला होता तर चिपळूणमध्ये मराठा बांधवांनी मोर्चा काढून बंदचे आव्हान करत बाजारपेठेतून मोर्चा काढला. 

तर बंदमध्ये अत्यावश्यक सुविधा वगळून सर्वच बाजारपेठांमध्ये बंद पाळण्यात आला. काल रात्रीपासूनच दुकाने, प्रतिष्ठाने बंद होती. मराठा तरुण मोटार सायकलवरून बंद पाळण्याचे आवाहन करत होते. तर एसटी बसेस बंद असल्याने वाहतूक ठप्प आहे.