Sat, Jan 25, 2020 07:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवन उभे राहावे : डॉ. प्रतापसिंह जाधव

प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवन उभे राहावे : डॉ. प्रतापसिंह जाधव

Published On: Aug 26 2019 2:07AM | Last Updated: Aug 26 2019 2:07AM
ठाणे : प्रतिनिधी

मुंबईमध्ये  मराठा  समाजाचे  भवन  असावे  अशी  मागणी  अखिल  मराठा  फेडरेशनच्या  वतीने  करण्यात  येत असली तरी केवळ मुंबईमध्येच नव्हे, तर राज्यातील सर्वच  जिल्ह्यात  मराठा  भवन  असावे,  असे  प्रतिपादन  पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री  डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी ठाण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठा फेडरेशनच्या अधिवेशनात केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या मागणीचे स्वागत केले.

मराठा     आरक्षणामध्ये     महत्त्वाची     भूमिका     बजावल्याबाबद्दल   डॉ.   प्रतापसिंह   जाधव   यांचा   फेडरेशनच्या  वतीने  पालकमंत्री  एकनाथ  शिंदे  यांच्या  हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना त्यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.

आपल्या    भाषणाच्या    सुरुवातीलाच    मराठा    फेडरेशनच्या  वतीने  पूरग्रस्तांना  मदत  केल्याबद्दल  डॉ.  प्रतापसिंह    जाधव  यांनी  फेडरेशनच्या  कार्यकारिणीचे  कौतुक केले. कोल्हापूर, सांगली या भागात पूरपरिस्थिती निर्माण   झाल्यानंतर   पालकमंत्री   एकनाथ   शिंदे   हे   कोल्हापूरमध्ये    आल्यानंतर  आपली  भेट  झाली  होती.  ठाण्यात  काही  दहीहंडी  उत्सवांनी  पूरग्रस्तांना  मदत  केल्याने पूरग्रस्तांच्या मदतीला ठाणेकर धावले. त्यामुळे ठाणेकरांचे  मी  आभार  मानतो  असे  त्यांनी  सांगितले.  ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष पी. सावळाराम, आनंद दिघे यांच्याशी फार जुने संबंध असून तेव्हापासून मी ठाण्याशी जोडलो  गेलो  आहे.    त्यामुळे  ठाण्याशी  माझी  नाळ  1964 पासून जोडली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारची मदत करताना मराठा समाज मागे राहत  नाही,  याचे  उदाहरण  देताना  कारगिल  युद्धामध्ये  समाजाच्या  वतीने  सियाचीन  येथे  हॉस्पिटल  बांधून  5  कोटींची मदत दिल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

 सध्या मी माझे आत्मचरित्र लिहीत आहे. यामध्ये यशवंतराव चव्हाणांपासून आतापर्यंत मराठा समाजाचे 11 मुख्यमंत्री होऊन गेले, याचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. शाहू महाराजांच्या काळात मराठा समाजाला 50 ट क्के आरक्षण लागू करण्यात आले होते. मात्र 117 वर्षांनी मराठा समाजाला आरक्षण या सरकारच्या काळात मिळाले  असले  तरी  मराठा  समाजाच्या  एकजुटीने  हे  आरक्षण मिळाले असल्याचे ते म्हणाले. जातीयवादाचा शि क्का लागू नये म्हणून इतर संपादक मराठा समाजच्या संमेलनाला येत नाहीत मात्र इतर समाजाच्या संमेलनाला जातात. मला जातीयवादी म्हटले तरी चालेल, आरक्षण समितीमध्ये असलेला मी एकमेव संपादक होतो, त्यामुळे पुढारी तुमचे ह क्काचे व्यासपीठ असल्याचे यावेळी जाधव यांनी सांगितले.

पुढारीचे योगदान अद्वितीय : अ‍ॅड. शशिकांत पवार

मराठा   आरक्षणाच्या   लढाईत   दैनिक   पुढारीचे   मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे आणि दैनिक पुढारी वृत्तपत्राचे योगदान अनमोल राहिले आहे. अखिल  मराठा  समाजाचा  बुलंद  आवाज  सरकारपर्यंत  पोहचवण्याचे कार्य पुढारीने केले आहे, असे प्रतिपादन अखिल  मराठा  फेडरेशनचे  संस्थापक  अध्यक्ष  अ‍ॅड.  शशिकांत पवार यांनी अखिल मराठा संमेलनात केले. ते   म्हणाले,   अखिल   मराठा   फेडरेशनची   स्थापना   करण्यामागील  उद्देश  हाच  होता  की,  समाजातील  सर्व  संस्था  आणि  संघटना  एकत्र  याव्यात  आणि  तो  उद्देश  पूर्णत्वास आल्याचा मला मनस्वी आनंद आहे.