होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बहिणीबरोबर चॅटींग केले म्‍हणून युवकावर जीवघेणा हल्‍ला

बहिणीबरोबर चॅटींग केले म्‍हणून युवकावर जीवघेणा हल्‍ला

Published On: Feb 16 2018 10:38AM | Last Updated: Feb 16 2018 10:38AMडोंबिवली : वार्ताहर

बहिणीशी चॅटींग केल्याचा राग मनात धरून भावाने एका तरूणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना डोंबिवलीजवळच्या आजदे गावात गुरुवारी संध्याकाळी घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणावर निवासी विभागातील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हल्लेखोर भाऊ अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मंदार तेली असे जखमी तरुणाचे नाव असून तो हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे. १४ फेब्रुवारी रोजी सर्वत्र व्हॅलेंटाईन डे सर्वत्र साजरा करण्यात येत होता. या दिवशी आजदे गावात राहणारा मंदार तेली या तरूणाने एका तरुणीशी सोशल मीडियावरून चॅटींग करून तिला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या. यामुळे आपल्या बहिणीशी गेल्या दीड महिन्यापासून मंदार हा चॅटींग करीत असल्याच कळताच या तरुणीचा भाऊ प्रवीण उडगी याने त्याचा मित्र पवन घाडीगावकर याच्या मदतीने गुरुवारी सायंकाळी  मंदार याच्या आजदे गावात जाऊन त्याच्यावर धारदार चाकूने वार केले. यानंतर त्‍याला दुचाकीवरून नेपच्यून हॉस्पिटलच्या गेटवर टाकण्यात आले. 

या हल्‍ल्यात मंदार हा गंभीर जखमी झाला असून त्‍याला एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. हल्‍ला करणारे प्रवीण उडगी व त्याला साथीदार पवन घाडीगावकर दोघे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त रविंद्र वाडेकर यांनी दिली.