Mon, Jun 17, 2019 02:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बुलेट ट्रेन सर्वेला ठाण्यात मनसेचा तीव्र विरोध

बुलेट ट्रेन सर्वेला ठाण्यात मनसेचा तीव्र विरोध

Published On: May 07 2018 2:52PM | Last Updated: May 07 2018 2:52PMठाणे : प्रतिनिधी

मुंबई सीकेपी ते गुजरात या मार्गे जाणाऱ्या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गाकरिता शेतकऱ्यांची जमीन जाणार असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसई येथील सभेमध्ये बुलेट ट्रेन करिता शेतकऱ्यांनी जमिनी देऊ नका अशी उद्घोषणा केली होती. तसेच रूळ टाकले तर रूळ उखडून टाका असे सांगितले होते. 

त्यानंतर आज सोमवारी दिव्यातील शीळ परिसरात रेल्वे अधिकारी, जिल्हा भु अभिलेख अधिकारी यांनी संयुक्त बुलेट ट्रेनचा सर्वे करण्यास शीळ फाटा येथून सुरुवात केली असता, मनसेच्या जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांना तीव्र विरोध केला. मोजणी करण्यास देखील विरोध केल्याने अधिकारी आणि मनसे पदाधिकारी यांच्यात वाद निर्माण झाला.

जागेची मोजणी सुरु असताना मनसे कार्यकर्त्यांनी तुफान गोंधळ घातला. पोलिसांचा बंदोबस्त असतानाही मनसे कार्यकर्त्यांनी घुसखोरी करत जागेची मोजणी बंद पाडली. कार्यकर्त्यांनी जागेची मोजणी करण्याचे मशीन देखील फेकून दिले. 

राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले असून शिळफाटा येथे आंदोलन केले आहे. दरम्यान जागेची मोजणी आता सुरु राहणार की तात्पुरती बंद करण्यात येणार आहे हे स्पष्ट झाले नाही. जागेची मोजणी पूर्ण झाल्यास कार्यकर्ते अजून आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Tags : manase, opposition, bullet train, Survey