Fri, Apr 26, 2019 19:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : रेल्वे स्थानकावर भरदिवसा तरुणीचे चुंबन(व्हिडिओ)

मुंबई : रेल्वे स्थानकावर भरदिवसा तरुणीचे चुंबन(व्हिडिओ)

Published On: Feb 23 2018 10:21AM | Last Updated: Feb 23 2018 10:25AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबईत केव्हाही आणि कोठेही फिरु शकता आणि महिलांसाठी मुंबई शहर सुरक्षित आहे, असे अनेकदा सांगितले जाते. मात्र, भरदिवसा आणि तेही रेल्‍वे स्‍थानकावर एखाद्या मुलीचा किस घेण्यासारखे प्रकार मुंबईत होताना दिसत आहेत. नुकताच असा एक प्रकार समोर आला आहे. 

गुरुवारी सकाळी नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्थानकावर भरदिवसा एका तरुणीचा विनयभंग करण्यात आला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पीडित तरुणी घणसोलीला जाण्यासाठी सकाळी ११. ३० च्या सुमारास रेल्‍वे स्‍थानकावर लोकल ट्रेनची वाट पाहत उभी होती एवढ्यात एक व्यक्‍ती तिच्या मागून आला आणि जबरदस्‍तीने तिचा किस घेण्याचा प्रयत्‍न केला. मुलीने प्रतिकार करत त्‍याला बाजूला केल्‍यानंतर तो तेथून पसार झाला. नरेश जोशी (वय, ४३) असे या आरोपीचे नाव असून, रेल्‍वे पोलिसांनी त्‍याला ताब्‍यात घेतले आहे. 

नरेशने पीडित मुलीसोबत जबरदस्‍ती केली त्‍यावेळी आरपीएफ पथक सीसीटीव्ही फुटेज पाहत होते. एका अधिकाऱ्याच्या ही गोष्‍ट लक्षात येताच त्‍यांनी पोलिसांना घटनास्‍थळी पाठविले. पोलिसांनी मुलीची चौकशी करून आरोपी ज्‍या दिशेने पळून गेला तिकडे त्‍याचा शोध घेतला असता प्लॅटफॉर्म क्र. २-३ जवळच्या सबवेतून त्‍याला पोलिसांनी अटक केली. 

पीडित तरूणीने याबाबत रेल्‍वे पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून नरेशवर गुन्हा दाखल केला आहे.