Tue, Apr 23, 2019 09:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोदी योजनेच्या नावाने एनएसजी कमांडोला गंडा

मोदी योजनेच्या नावाने एनएसजी कमांडोला गंडा

Published On: Jul 20 2018 9:40AM | Last Updated: Jul 20 2018 9:39AMमुंबई : अवधूत खराडे

मोदी सरकारची योजना असून 14 लाख 80 हजार रुपयांचे बक्षिस लागल्याची बतावणी करत ठगांनी एका एनएसजी कमांडोला तब्बल 2 लाख 42 हजार रुपयांना चूना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने एनएसजी कॅम्पमध्ये एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळचा उत्तरप्रदेशमधील रहिवाशी असलेला अजितकुमार पाल हा तरुण पवईतील एनएसजी कॅम्प येथे शिपाई म्हणून कर्तव्य बजावत आहे. 25 जूनला कर्तव्यावर असताना सकाळी साडेनऊच्या सुमारास अनोखळी नंबरवरुन त्याला मॅसेज आला. मॅसेज करणार्‍या व्यक्तीने पाल याचे थेट अभिनंदन करत, जीनीअस इंम्पोर्ट एक्स्पोर्ट कंपनीमध्ये तुम्ही पहीले विजेता आहात. अभिनंदन करत, तुम्हाला एक नवी कोरी महिंन्द्रा कंपनीची कार देण्यात येत आहे. कार नको असेल तर 14 लाख 80 रुपयांची रोख रक्कम देण्यात येईल असे सांगितले.

मॅसेज वाचून मोबाईल बाजूला ठेवणार तोच या अनोळखी नंबरवरुन पाल याला कॉल आला. कॉल करणार्‍या व्यक्तीने डिको यादव बोलत असल्याचे सांगून तुम्हाला बक्षिसामध्ये कार पाहीजे की, रोख रक्कम अशी विचारणा केली. तूम्ही कोठून बोलत आहात. हे सर्व काय आहे, अशी विचारणा पाल यांनी त्याला केली. त्यावेळी त्याव्यक्तीने झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातून बोलत असून ही स्कीम मोदी सरकाराने काढल्याचे त्याला सांगितले. पाल हा आपल्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच, या व्यक्तीने त्याला आता रजिस्ट्रेशनसाठी फक्त 8 हजार 500 रुपये भरावे लागतील असे सांगून फोन ठेवला.

पैसे भरुनही बक्षिसाची रक्कम मिळत नसल्याने पाल याने दोघांचीही उलट झडती घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर मात्र दोन्ही फोन बंद करुन ठग नॉटरिचेबल झाले. अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने पाल याने पवई पोलीस ठाणे गाठून 2 लाख 42 हजार 200 रुपयांची फसवणूकीची तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोदी सरकारच्या योजनेमूळे आपल्याला खरोखरच बक्षिस लागल्याची खात्री पटल्याने पाल याने फोन करणार्‍या व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यात नमूद रक्कम भरली. त्यानंतर या ठगाने 4 जुलैपर्यंत पाल याच्याजवळून तब्बल 1 लाख 47 हजार 300 रुपये उकळले. तर बक्षिस लागलेल्या कंपनीचा मॅनेजर राकेश बोलत असल्याचे सांगून, आपने जो अभी फिस भरी है, वह पैसे ट्रांन्सफर नही हो रही है, उस पैसो को ट्रांन्सफर करने के लिये, आपको कुछ चार्जेस भरने पडेंगे, असे सांगून प्रोसेसिंग फी, कर, जीएसटी अशी वेगवेगळी कारणे देत त्याच्याजवळून 94 हजार रुपये उकळले.