Sun, Dec 15, 2019 04:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वे वरून जाऊनही तो वाचला!(VIDEO)

रेल्वे वरून जाऊनही तो वाचला!(VIDEO)

Published On: Jun 27 2019 9:46AM | Last Updated: Jun 27 2019 9:53AM
ठाणे : प्रतिनिधी

आसनगाव रेल्वेस्थानक येथे पादचारी पूल असून देखील प्रवासी रुळावरून सतत प्रवास करत असतात. स्थानक परिसरात सुरक्षा व्यवस्था असून देखील रुळावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना वेळीच रोखण्यात पोलिसांना अपयश येत आहे. अशाच एका घटनेत एक प्रवाशी थोडक्यात वाचला आहे. 

कल्याण स्थानक येथून मंगळवारी संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी आसनगाव लोकल आसनगाव रेल्वे स्थानक परिसरात आली असता या लोकलमधून प्रवासी फलाटावर उतरून थेट रूळ क्रॉस करत होते. यावेळी बाजूच्या रुळावरून आलेल्या मेल गाडीमुळे प्रवासी रुळांच्या बाजूला गेले. यातील एक प्रवासी प्लॅटफॉर्मच्या बाजूला रुळांच्या बाजूकडील भागात जाऊन बसला. मेल गाडी जाईपर्यंत तो तिथेच दडून बसला. बघणाऱ्या प्रवाशांना वाटले की या प्रवाशाचा अपघात झाला परंतु मेल गाडी निघून गेल्यानंतर तो जागीच उभा राहून रुळावरून चालत बाहेर गेला. 

अशा घटना आसनगाव रेल्वे स्थानक तसेच कल्याण पुढील कर्जत आणि कसारा मार्गावर सतत घडत आहेत. परंतु रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे प्रवासीच सांगत आहेत. सुरक्षेचा स्थानक परिसरात गंभीर प्रश्न असून देखील लक्ष दिले जात नाही. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढतच आहे.