Fri, Apr 26, 2019 01:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माळशेज घाटात दरड कोसळली; दोन जण जखमी

माळशेज घाटात दरड कोसळली; दोन जण जखमी

Published On: Jul 14 2018 10:11PM | Last Updated: Jul 14 2018 10:11PMमुरबाड : प्रतिनिधी 
मुरबाड माळशेज घाटातील वाहतुक आज दुपारी साडेतीन वाजता छत्री पॉईंट जवळ दरड कोसळल्याने ठप्प झाली आहे. दरवर्षी पावसामुळे माळशेज घाट धोक्यात येतो. यावर्षी देखील मुसळधार पावसाने माळशेज घाटात दरड कोसळली आहे.  दुर्दैवाने श्रद्धा पाटील  व सुजाता पाटील या दोन महिला गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच तहसिलदार सचिन चौधर व नायब तहसिलदार हनुमंत जगताप घटनास्थळी रवाना झाले आहेत. जिल्हा अधिकारींचे आदेश धाब्यावर बसवल्यानेच हे पर्यटक  जखमी झाल्याचे समोर आले आहे. जखमीना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घाटात दरड कोसळलेल्या भागात दगड उचलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. तसेच वाहतुकीसाठी घाट लवकरच सुरु होणार असल्याची माहिती उप-विभागीय अभियंता पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी व कर्मचारी याठिकाणी तातडीने रवाना झाले आहेत. दगड हटविण्याचे काम पूर्ण होत असून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे असे राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांनी सांगितले.