Sat, Nov 17, 2018 12:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माळी हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी महेंद्र ठाकूरसह आठ जणांना अटक

माळी हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी महेंद्र ठाकूरसह आठ जणांना अटक

Published On: Feb 08 2018 1:48AM | Last Updated: Feb 08 2018 12:33AMनालासोपारा : वार्ताहर

वसईच्या शिलोत्तर गावाचे माजी सरपंच बबन माळी यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख  आरोपी महेंद्र ठाकूर याला बुधवारी दुपारी वालीव पोलिसांनी काशिमिरा  येथून अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून केवळ एक महिला आरोपी फरार आहे.

वसई पूर्वेत शिलोत्तर गावात राहणारे बबन माळी (42) यांची सोमवारी महेंद्र ठाकूर याने व्यावसायिक वादातून गोळ्या झाडून हत्या केली. यावेळी दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याने गावात तणाव निर्माण झाला. मृत माळी यांच्या समर्थकांनी मुख्य आरोपी महेंद्र ठाकूरच्या बंगल्याची नासधूस करून वाहने पेटवली तसेच रास्तारोको केला. वालीव पोलिसांनी 4 जणांना अटक केली. मात्र, महेंद्र ठाकूर फरार होता. त्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली होती. तो दोन दिवस पोलिसांना दमण, मुंबई असा सारखे लोकेशन बदलून गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी ठाकूरला काशिमिरा येथून अटक केली. 

 या प्रकरणात सुनीता, सुशीला, जिजा बलराम, शिवशंकर ठाकूर ऊर्फ बचवा यांना मंगळवारी अटक करण्यात आली. तर  महेंद्र ठाकूर, धीरज ऊर्फ बंटी ठाकूर, बंटीचा मामा जिजा प्रभाकर यांना बुधवारी अटक करण्यात आली. महेंद्रची पत्नी विजेता ठाकूर फरारी असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी सांगितले.