Sun, May 19, 2019 22:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नालासोपारा प्रकरणी आणखी एकास अटक; ३१ पर्यंत पोलिस कोठडी

नालासोपारा प्रकरणी एकास अटक; पोलिस कोठडी

Published On: Aug 25 2018 10:45AM | Last Updated: Aug 25 2018 6:07PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

नालासोपारा स्फोटकप्रकरणी अटक घाटकोपरमधून अटक करण्यात आलेल्या अविनाश पवार याला सत्र न्यायालयाने ३१ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याला काल रात्री दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, काल एटीएसने केलेल्या कारवाईत घाटकोपरमधील अविनाश पवार याला अटक केली होती. बॉम्ब बनवण्यात त्याचा महत्त्वाचा सहभाग होता. तसेच त्याचे प्रशिक्षणही घेतले होते अशी माहिती तपासात समोर आली आहे.

यापूर्वी अटक करण्यात आलेले आरोपी वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर, श्रीकांत पांगरकर यांच्या संपर्कात तो होता असा दावा एटीएसने न्यायालयात केला. अविनाश पवार याच्याजवळ मोबाईल, कॉम्प्युटर आणि हार्ड डिस्क असा ऐवज जप्त केला आहे.