Mon, Sep 23, 2019 00:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठरलं; 'या'दिवशी राज्यात निवडणूक जाहीर होणार!

ठरलं; 'या'दिवशी राज्यात निवडणूक जाहीर होणार!

Published On: Sep 12 2019 2:40PM | Last Updated: Sep 12 2019 3:27PM

महाराष्ट्र विधानसभा संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्रासह हरियाणा आणि झारखंडमध्ये निवडणूक पूर्व रणधुमाळी जोरात सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून राज्यात राजकीय पक्षांच्या यात्रांनी त्यामध्ये आणखी भर घातली आहे. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबरला समाप्त होत आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या मध्यावधीमध्ये विधानसभा निवडणूक होईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी  दिली होती. 

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय  निवडणूक आयोगाची आज (ता.१२) आढावा बैठक होत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी ही शेवटची बैठक असणार आहे. या बैठकीनंतर तिन्ही राज्यातील तिन्ही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. निवडणूक अधिकाऱ्यांनी आजच्या आढावा बैठकीपूर्वी राज्यांचा दौरा केला आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी विधानसभा निवडणुक कार्यक्रमल जाहीर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूक तारखा सोमवारी जाहीर होण्याचे जवळपास निश्चित झाले असले, तरी  झारखंड निवडणूक तारखा नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.