Sat, Apr 20, 2019 09:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पदवीधर मतदारसंघात डावखरे विरुद्ध मोरे थेट लढत 

पदवीधर मतदारसंघात डावखरे विरुद्ध मोरे थेट लढत 

Published On: Jun 28 2018 9:49AM | Last Updated: Jun 28 2018 9:49AMनवी मुंबई :  प्रतिनिधी 

नवी मुंबईत नेरूळ येथील आगरी कोळी भवनात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली आहे. या निवडणूकीत खरी लढत ही भाजप विरोधात शिवसेना अशी थेट होणार आहे. त्‍यामुळे संपूर्ण राज्‍याचे लक्ष या मतमोजणीकडे लागले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेले स्वर्गीय विधान परिषदेचे  माजी  उपसभापती वसंत डावखरे यांचे पुत्र निरंजन डावखरे आणि ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांच्यात सामना रंगणार आहे. शिवसेना नेते अदित्य ठाकरे यांनी मोरे यांच्यासाठी संपूर्ण पदवीधर मतदारसंघ पिंजून काढला होतो तर भाजपकडून कोकणातील सर्व आमदार व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. 

मुंबई शिक्षक मतदारसंघात एकूण पुरुष-3161  स्त्री-7009 एकूण-10170 मतदार होते. त्यापैकी पुरुष-2763 स्त्री-5590 एकूण-8353 मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी 82.13 आहे.  यामध्ये मुंबई उपनगर जिल्हयात पुरुष- 2715 स्त्री-5566 एकूण-8281 मतदार होते. त्यापैकी पुरुष-2387 स्त्री-4446 एकूण-6833 मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी 82.51 आहे. मुंबई शहर जिल्हयात पुरुष-446  स्त्री-1443 एकूण-1889 मतदार होते. त्यापैकी पुरुष-376 स्त्री-1144 एकूण-1520 मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी 80.47 आहे. 

मुंबई पदवीधर मतदारसंघात 52.81 टक्के मतदान
मुंबई पदवीधर मतदारसंघात एकूण पुरुष-40775  स्त्री-29738 एकूण-70513 मतदार होते. त्यापैकी पुरुष-22651 स्त्री-14586 एकूण-37237 मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी 52.81 आहे. यामध्ये मुंबई उपनगर जिल्हयात पुरुष-30018 स्त्री-22142 एकूण-52160 मतदार होते. त्यापैकी पुरुष-16615 स्त्री-10767 एकूण-27382 मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी 52.50 आहे. मुंबई शहर जिल्हयात पुरुष-10757  स्त्री-7596 एकूण-18353 मतदार होते. त्यापैकी पुरुष-6036 स्त्री-3819 एकूण-9855 मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी 53.70 आहे.