Tue, Jul 16, 2019 21:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारी कर्मचारी संपाच्या निर्णयावर कायम 

सरकारी कर्मचारी संपाच्या निर्णयावर कायम 

Published On: Aug 06 2018 5:24PM | Last Updated: Aug 06 2018 5:24PMमुंबई : प्रतिनिधी

सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी राज्य कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या तीन दिवसीय संपाच्या निर्णयावर संघटना कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ ऑगस्‍ट रोजी दिलेल्‍या आश्वासनांवर विश्वास न ठेवता सरकारी कर्मचाऱ्यांनी उद्यापासून (७ ऑगस्‍ट)तीन दिवसांच्या संपाचा निर्णय कायम ठेवला आहे. मुंबईत आज झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून समन्वय समितीचे सर्व घटक, मध्यवर्ती संघटनेचे राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. 

राज्य समनवय समितीचे निमंत्रक गजानन शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस मध्यवर्तीचे राज्य अध्यक्ष विश्वास काटकर, राज्य सहसचिव व समन्वय समितीचे कोल्हापूर जिल्हा निमंत्रक अनिल लवेकर, इतर पदाधिकारी, सर्व  संवर्ग संघटनांचे पदाधिकारी, बृहन्मुंबईचे मिलींद सरदेशमुख, अविनाश दौंड, चतुर्थश्रैणी मध्यवर्तीचे भिकु सावंत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.