Sat, Sep 22, 2018 12:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्चला जाहीर होणार

राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्चला जाहीर होणार

Published On: Feb 08 2018 4:18PM | Last Updated: Feb 08 2018 4:18PMमुंबई : प्रतिनिधी
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 फेब्रुवारीपासून मुंबईत सुरू होत आहे. या अधिवेशनात 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. वस्तू आणि सेवा कर कायद्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.

राज्यावरील कर्जाचा वाढता बोजा आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या बजेटमध्ये योजना आणि त्यावरील खर्चाचा ताळमेळ अर्थमंत्री कसा घालतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.