Fri, Jul 19, 2019 18:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसेने सुपारी देऊन गुंड पाठवले : सचिन सावंत

मनसेने सुपारी देऊन गुंड पाठवले : सचिन सावंत

Published On: Dec 01 2017 1:11PM | Last Updated: Dec 01 2017 3:23PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

मनसेच्या नपुसंक कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात कोणी नसताना भ्याड हल्ला केला आहे. या मनसेच्या हल्ल्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मनसे विरुध्द निरुपम हा वाद आणखी चिघळण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. 

मुंबई : मनसेचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला, तिघे ताब्यात

काँग्रेस कार्यालयावरील हल्‍ला; मनसेने जबाबदारी स्‍वीकारली 

नुकसानीची भरपाई मनसेने द्यावी : अशोक चव्हाण

आमच्या कार्यालयापासून आझाद मैदान पोलिस स्थानक अवघ्या २५ मीटर अंतरावर आहे. मात्र तरीही हा हल्ला झाला आहे.  मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांविरोधात कठोर कारवाई केली नाही तर मनसेला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा निरुपम यांनी दिला आहे. मनसेचे कार्यकर्ते फेरीवाल्यांकडून मार खात असल्याने त्यांच्यामध्ये तणावाची परिस्‍थिती आली आहे. त्यामुळे त्यांनी असा भ्याड हल्ला केल्याचा पलटवार निरुपम यांनी केला आहे. 

 

#MNS के कायर,नपुंसक और लुक्खे कार्यकर्ताओं ने हमारे पार्टी मुख्यालय तब तोड़फोड़ किया,जब वहाँ कोई नहीं था।
पुलिस स्टेशन 25 मीटर दूरी पर है।अगर CM @Dev_Fadnavis कार्रवाई नहीं करेंगे तो
करारा जवाब मिलेगा।

— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) December 1, 2017