Wed, Jul 17, 2019 09:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधान परिषदेच्या सहा जागांसाठी मतदान सुरू; प्रतिष्ठा पणाला 

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी मतदान सुरू

Published On: May 21 2018 10:59AM | Last Updated: May 21 2018 10:59AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी आज (सोमवारी)मतदान सुरू झाले. सिंधुदुर्ग - रत्नागिरी - रायगड, नाशिक, अमरावती, परभणी-हिंगोली, वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली आणि लातूर - बीड - उस्मानाबाद या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. या सहा जागांसाठी आज (२१ मे) मतदान होत असून निकाल २४ मे रोजी जाहीर होणार आहेत. 

कोण आमने-सामने 

परभणी-हिंगोली -  विप्लव बजोरिया (शिवसेना) VS सुरेश देशमुख (काँग्रेस)

उस्मानाबाद-लातूर-बीड - सुरेश धस (भाजप) VS अशोक जगदाळे (अपक्ष) - राष्ट्रवादीचा पाठिंबा

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग - अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)  VS राजीव साबळे  (शिवसेना)

नाशिक - नरेंद्र दराडे (शिवसेना) VS शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी)

अमरावती -  प्रवीण पोटे (भाजप) VS अनिल मधोगरिया  (काँग्रेस)

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली - इंद्रकुमार सराफ (काँग्रेस)  VS रामदास अंबटकर (भाजप)

उस्मानाबादमध्ये भाऊ-बहिणीची प्रतिष्ठा पणाला

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे भाऊ-बहीण लातूर - बीड - उस्मानाबाद या मतदारसंघात पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. भाजपने राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री सुरेश धस यांना उमेदवारी दिली असून, राष्ट्रवादीने ऐनवेळी दगाफटका झाल्यानंतर अपक्षाला पाठिंबा दिला आहे. 

संख्याबळ स्पष्ट आहे ? 

या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकांचे नगरसेवक मतदान करणार असल्याने कुठे कुणाचे संख्याबळ किती आहे, हे स्पष्ट आहे. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असून, त्यानुसार सिंधुदुर्ग - रत्नागिरी - रायगड (कोकण), नाशिक आणि लातूर - बीड - उस्मानाबाद या तीन जागा राष्ट्रवादीला, तर अमरावती, परभणी - हिंगोली आणि वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली या जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. मात्र, भाजप आणि शिवसेना यांच्यात युती नसली, तरी त्यांनी एकमेकांविरोधात उमेदवार देण्याचे टाळले आहे.  

अंतर्गत संबंध निकालावर अवलंबून

राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे कधी नव्हे, ते या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले असल्याने या निकालांवर सेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील संबंधात सुधार-बिघाड होणे अवलंबून आहे. मात्र, या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी यांची चांगलीच कसोटी लागणार असून, शिवसेनेपुढेही आव्हान आहे.