Sat, Nov 17, 2018 06:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डिजीटल महाराष्ट्रात शासनाचे संकेतस्थळ बंद

डिजीटल महाराष्ट्रात शासनाचे संकेतस्थळ बंद

Published On: Feb 16 2018 12:42PM | Last Updated: Feb 16 2018 1:36PMमुंबई : प्रतिनिधी

स्वच्छ आणि पारदर्शक करभाराबरोबर गतिमान कारभाराची माहिती तंत्रज्ञानाचा सर्वच क्षेत्रातील वापर वाढवत डिजीटल महाराष्ट्राचे स्वप्न राज्य सरकारकडून दाखविले जात आहे. त्याच राज्य सरकारची www.maharashtra.gov.in ही वेबसाईट सकाळपासून बंद पडली आहे. यामुळे विविध शासकीय योजनांसाठी ऑनलाईन नोंदणी करणे, अर्ज करणाऱ्याचा गोंधळ उडाला आहे. 

राज्य सरकारच्या जवळपास ३९ विभागांच्या कारभाराची माहिती सातत्याने www.maharashtra.gov.in  संकेतस्थळावर अपलोड करण्यात येते. या संकेतस्थळामध्येच राज्य सरकारच्या इतर विभागाच्या वेबसाईटची लिंक जोडण्यात आलेले आहेत. या वेबसाईटला रोज  असंख्य नागरिक विविध योजना आणि त्यासाठी करण्यात येणाऱ्या अर्जासाठी भेट देत असतात. ही वेबसाईटच शुक्रवार सकाळपासून बंद पडल्याने गोंधळ उडाला आहे.

Image may contain: text

आठवड्याभरात तिसऱ्यांदा राज्य  शासनाची वेबसाईटव क्रॅश झाल्याने डिजीटल कारभार कसा चालणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे मॅग्नेटिक महाराष्ट्रसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करून विविध क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यावर भर देण्यात येत असताना जर सरकारचे संकेतस्थळच वारंवार बंद पडणार असेल तर केवळ माहिती तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच भवितव्य काय असा प्रश्न उपस्‍थित होत आहे.