Wed, Sep 26, 2018 12:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरेगाव भीमा  चौकशीचा केवळ फार्स : काँग्रेस

कोरेगाव भीमा  चौकशीचा केवळ फार्स : काँग्रेस

Published On: Feb 10 2018 4:11PM | Last Updated: Feb 10 2018 4:11PMमुंबई : प्रतिनिधी

कोरेगाव भीमा दंगली प्रकरणाची निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील द्वीसदस्यीय चौकशी समिती हा केवळ फार्स असल्याची टीका काँग्रेसने केली असून या चौकशीस विरोध दर्शविला आहे.

मुख्यमंत्र्यांनी  कोरेगाव भीमा दंगलीच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची घोषणा केली होती. एखाद्या चौकशी आयोगावर विद्यमान न्यायाधीश नेमायचे की नाही,  हे ठरविण्याचे अधिकार उच्च न्यायालयाचे असताना मुख्यमंत्र्यांनी कोणत्या अधिकारात ही घोषणा केली? अशी विचारणा काँग्रेस पक्षाने केली होती.  माननीय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी संबंधित चौकशी आयोगासाठी विद्यमान न्यायाधीश देण्याचे नाकारले आहे, हे सरकारसाठी नामुष्कीचे आहे. असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.

कोरेगाव भीमा घटनेमागे नियोजनबद्ध गुन्हेगारी स्वरूपाचे कट-कारस्थान असल्याचे स्प्ष्टपणे दिसून येते आहे. परंतु, राज्य सरकारने नेमलेल्या द्वीसदस्यीय चौकशी आयोगाला फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यांची चौकशी करण्याचे अधिकारच नाहीत. तसेच कमिशन ऑफ इन्क्वायरी अॅक्ट अंतर्गत हा चौकशी आयोग नेमला असला तरी सदर अहवाल सरकारला बंधनकारक नसतो. त्यामुळे ही चौकशी म्हणचे निवळ फार्स असल्याची टीका काँगेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.