Fri, May 24, 2019 02:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधानसभा अध्यक्षांच्या बाजूने सरकारचा विश्वास ठराव सादर

विरोधकांना चपराक; अविश्वास प्रस्तावाआधीच अध्यक्षांच्या बाजूने ‘विश्वास’

Published On: Mar 23 2018 1:22PM | Last Updated: Mar 23 2018 1:34PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विश्वास ठराव आज (23 मार्च) विधानसभेत मंजूर करण्यात आला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा ठराव विधानसभेत मांडल्याने अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांना चपराक बसली आहे. आवाजी मतदानाने हा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला. 

विधानसभेचे कामकाम सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापती बागडे यांच्या बाजून विश्वास प्रस्ताव मांडला. विश्वास प्रस्तावाला शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी अनुमोदन दिले. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मजूर करण्यात आला. विरोधक अविश्वास प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत असतानाच सरकारन‘विश्वास’ प्रस्ताव मांडून विरोधकांवर पलटवार केला.

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात विरोधकांनी (५ मार्च) रोजी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला होता. विरोधकांनी बागडे हे सभागृहात पक्षपाती व नियमबाह्य काम करीत असल्याचा आरोप बागडे यांच्यावर केला होता. यामुळे सभापती बगाडे यांना अध्यक्षपदावरून दूर करण्यात यावे अशी मागणीही विरोधकांनी केली होती. 

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निलंबनाच्या मागणीवरुन विधानसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला होता. या गदारोळात अध्यक्षांनी कामकाज पुढे रेटताना विरोधी पक्षांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचा विरोधकांचा आरोपही सभापती बागडे यांच्यावर करण्यात आला होता. 

हा तर सरकारचा पळपूटेपणा : अजित पवार 

विधानसभा अध्यक्ष एकाच पक्षाची बाजू घेतात, विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात हे चर्चेत आम्हाला सांगायचे होते. महाराष्ट्राच्या इतिहासात असे कधी घडले नव्हते. आम्ही सत्तेत असतानाही अविश्वासदर्शक ठराव आले पण आम्ही असे कधी वागलो नाही. सरकार मुस्कटदाबी करण्याचे काम करत आहे, असी टीका राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी केली. 

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनीही त्या ठरावाला अनुमोदन दिले, हे अन्यायकारक आहे. आम्हाला यावर चर्चा करायची होती मात्र तालिका अध्यक्षांनी सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब केले. सरकारने हे कृत्य करून पळपुटेपणा आहे, असेही ते म्हणाले.

 

Tags : maharashtra government, confidence, resolution, motion, haribhau bagade,