होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भ्रष्टाचाराच्या पर्वतावरून पारदर्शकतेच्या गप्पा; आता काँग्रेसचं व्यंगचित्र

'भ्रष्टाचाराच्या पर्वतावरून मुख्यमंत्र्यांच्या पारदर्शक गप्पा'

Published On: Jun 03 2018 3:29PM | Last Updated: Jun 03 2018 3:38PMमुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारमधील विविध मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे विरोधी पक्षांनी पुराव्यासह अनेकदा उघड केली. या प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार सिद्ध होत असतानाही राज्याचे मुख्यमंत्री मात्र सातत्याने जाणिवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करून भ्रष्ट मंत्र्यांना क्लिन चिट देत असतात. म्‍हणून भ्रष्टाचाराच्या पर्वतावर उभे राहून पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपा सरकारवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने व्यंगचित्राच्या माध्यमातून जोरदार हल्ला चढविला आहे.

सहकारमंत्री सुभाष देशमुखांना मुख्यमंत्र्यांनी अगोदरच दिलेली क्लिनचीट व आता बाळगलेले मौन या सरकारचा दांभिकपणा आणि भ्रष्टाचाराला असणारा पाठिंबा अधोरेखित करणारे आहे. काँग्रेस, राष्‍ट्रवादीसह विरोधी पक्षांनी सुभाष देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. परंतु, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर बोलणे टाळले आहे. काँग्रेसने या प्रकरणावर लक्ष वेधण्यासाठी व्यंगचित्राच्या माध्यमातून सत्ताधार्‍यांवर हल्‍लाबोल केला आहे. 

Image may contain: drawing

या व्यंगचित्रात सरकारची अब्रू वाचविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे सर्वांना क्‍लिन चिट देत असल्याचे दाखवले आहे. तसेच चौकशी समिती, एसीबी आणि पोलिस यंत्रणा या त्यासाठीच सरकारला मदत करत असल्याचे दर्शविले आहे. तर सरकारचा उल्‍लेख फडणवीस ऐवजी फसवणीस सरकार असा केला आहे.