Thu, Nov 22, 2018 01:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेसने भाजप-शिवसेनेला दिले अनोखे प्रमाणपत्र

राज्य सरकारचे ‘लाभार्थी’ फक्त दोघेच !

Published On: Dec 24 2017 6:42PM | Last Updated: Dec 24 2017 6:42PM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

‘सत्तेवर असणाऱ्या राज्य सरकारच्या योजनांचे फक्त दोघेच लाभार्थी आहेत ते म्हणजे स्वत: भाजप आणि शिवसेना’, अशी टीका महाराष्ट्र काँग्रेस केली आहे. 

राज्य सरकारच्या लोकविरोधी कारभाराचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. या सरकारचे भाजप आणि शिवसेना हे दोघेच लाभार्थी असून राज्यातील जनतेच्या वतीने त्यांना ‘मी लाभार्थी’चे प्रमाणपत्र सोपवून प्रतिकात्मक निषेध काँग्रेसने नोंदवला आहे. यासंदर्बातील ट्विट महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आले आहे. या ट्विटच्या खाली एक प्रमाणपत्र पोस्ट करण्यात आले आहे. 

‘आपला भ्रष्टाचाराचा विक्रम आणि ‘क्लिन चीट’ देण्याचा सपाटा या दोन्हीचा वेग निश्चितष वाखाणण्याजोगा आहे तसेच अवास्तव घोषणा आणि त्या घोषणांच्या जाहिरातबाजीवरील आपली कामगिरी निव्वळ अतुलनीय आहे’ असेही या प्रमाणपत्रात म्हणण्यात आले आहे.