Tue, Nov 20, 2018 21:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अर्थसंकल्‍प की कवी संमेलन : राधाकृष्ण विखे पाटील

अर्थसंकल्‍प की कवी संमेलन : राधाकृष्ण विखे पाटील

Published On: Mar 09 2018 5:46PM | Last Updated: Mar 09 2018 5:45PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

विधानसभेत आज राज्य सरकारकडून अर्थसंकल्‍प मांडण्यात आला. हा अर्थसंकल्‍प निराशजनक असल्याचे विरोधकांनी म्‍हटले आहे. मांडलेला अर्थसंकल्‍प हा निव्‍वळ आकड्यांचा खेळ असून जुन्‍याच गोष्टी नव्‍याने मांडण्यात आल्या असल्याची टीका विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्‍प सादर करत असताना सरकारचे कौतुक करीत होते, यावेळी मुनगंटीवार शेरोशायरीमध्ये रंगत होते. यावरूनही विरोधकांनी लक्ष्य करीत अर्थसंकल्‍प होतो की, कवी संमेलन अशी टीकाही केली. 

या अर्थसंकल्‍पात दारिद्र रेषेखाली असणार्‍या नागरिकांना डावलण्यात आले आहे. रोजगाराचा प्रश्न उपस्‍थित करून २ कोटी रोजगार देण्याचे अश्वासन देणार्‍या सरकारने २ लाख बेरोजगारांनाही रोजगार दिला नसल्याची टीका विरोधी पक्षांनी केली. 

सरकारकडून निव्‍वळ घोषणा करण्यात आल्या आहेत.मुनगंटीवारांनी सादर केलेला अर्थसंकल्‍प अर्थशून्य असल्याची जोरदार टीकाही विखे पाटील यांनी केली.