Tue, Aug 20, 2019 04:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्‍ट्र बंद अपडेट : राज्यभरात बंदला प्रतिसाद; पुण्यामध्ये आंदोलनाला गालबोट

महाराष्‍ट्र बंद अपडेट : राज्यभरात बंदला प्रतिसाद; पुण्यामध्ये आंदोलनाला गालबोट

Published On: Aug 09 2018 7:49AM | Last Updated: Aug 09 2018 7:04PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आज (९ ऑगस्‍ट) रोजी मुंबईसह महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी बंदला सकाळपासूनच उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद आहे. राज्यभरात बहुतेक ठिकाणी बंदच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुटी देण्यात आली आहे. बंदच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्‍था कडक केली आहे. गावपातळीपासून हा बंद पुकारण्यात आला असून मोठ्या प्रमाणात मराठा समाज रस्‍त्यावर उतरला आहे. गावापासून ते जिल्‍ह्यापर्यंत सर्व रस्‍ते अडविण्यात येणार आहेत. यादरम्यान, रुग्‍णवाहिका, स्‍कूल बस, धार्मिक यात्रेकडे जाणारी वाहने आदींना वगळण्यात आले आहे. 

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या औरंगाबाद येथील बैठकीत महाराष्‍ट्र बंदचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला ३२ जिल्ह्यांमधून समन्वयक उपस्थित होते. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असून, बंदमध्ये कोणतीही हिंसा करु नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

संबंधित :

ताऱ्यात कडकडीत बंद

महाराष्ट्र बंद मुंबई LIVE : लोकल थंडावल्या

महाराष्ट्र बंद : २०० आगारातील एसटी बंद 

मराठा क्रांती मोर्चा बंद :  जाणून घ्या आचारसंहिता 

महाराष्‍ट्र बंद पुणे Live : मार्केटयार्डात पदयात्रेला सुरुवात 

राज्यातील अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद 

नवी मुंबईला पोलीस छावणीचे स्वरूप

 मुंबईसह आज महाराष्ट्र बंद

आंदोलनावर ड्रोनची नजर!

पोलिसांना ‘गनिमी कावा’ची भीती

सातारा:आनेवाडी टोलनाक्यावर शुकशुकाट Video

कराड-विटा मार्गावर आंदोलकांचा जनावरांसह ठिय्या (Video)

 LIVE अपडेट : संपूर्ण महाराष्ट्र बंद एका नजरेत

बीड : तामिळनाडूहून नारळ घेऊन औरंगाबादकडे जात असलेला ट्रक बीड शहराजीक सोलापूर- धुळे बायपासवर पेटवून देण्यात आला.

औरंगाबाद : वाळूज येथे पोलिसांचा हवेत गोळीबार

नगर : राहुरीत नगर मनमाड रस्त्यावर आंदोलक जेवणासाठी बसले. पोलिसांचा फौजफाटा तैनात. रुग्णवाहिका अथवा रुग्ण घेऊन जाणारे वाहने वगळता सर्व वाहनांना थांबविण्यात आले आहे. राहुरी मध्ये सर्व धर्मियांचा आंदोलनास पाठिंबा

नगर : बारागाव नांदूर येथे मराठा आरक्षण बंदला मुस्लिम समाजाकडून पाठिंबा. छत्रपती शिवाजी चौक येथे उपस्थित बांधवांनी सर्व कामकाज बंद ठेवत गावामध्ये मराठा आंदोलनास पाठिंबा दिला

पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त, कळंबोली शहरात कडकडीत बंद

रायगड : महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांचे शेकडो समर्थकांसह राष्ट्रीय महामार्गावर आगमन, मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता आजी-माजी आमदार एकत्र
 

सटाणा (नाशिक) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन 

नाशिक 

Image may contain: one or more people and outdoor

नाशिक 

Image may contain: one or more people, crowd and outdoor

नाशिकमध्ये बंदमुळे शुकशुकाट
Image may contain: sky, outdoor and nature

Image may contain: one or more people, people standing, sky, crowd, tree and outdoor

Image may contain: one or more people, people on stage, shoes and outdoor

Image may contain: 19 people, people smiling, people standing and outdoor

Image may contain: one or more people, people standing, wedding and outdoor

औरंगाबादमध्ये शीघ्र कृती दल तैनात 

सटाणा (नाशिक) : तालुक्यातील आराई येथे सकल मराठा समाज व  इतर सर्व समाजबांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अभिषेक, पुजा करुन मराठा क्रांती मोर्चास सुरुवात करण्यात आली

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चातर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी छावा संघटनेचे भीमराव मराठे यांनी आवाहन केले की मराठ्यांच्या मुलांनी आत्महत्या करू नये

कळवण (जळगाव) : शहारत भव्य विराट मोर्चा सुरुवात

जळगाव : येथे मराठा समाजाचे नेते मार्गदर्शन करत असताना मराठा समाजातील कार्यकर्ते सुरेश मराठेने अचानक रॉकेलची बाटली अंगावर ओतून घेऊन पेटवणार तोपर्यंत कार्यकर्ते व पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील प्रकार टळला

चाळीसगांव फाटा, टेहरे गाव, दाभाडी गाव, झोडगे गाव, नांदगाव फाटा, करंजगव्हान गाव, काळवाडी फाटा, रावळगाव वडनेर (नामपूर रास्ता), येथे रास्ता रोको

पुणे : पुण्यामध्ये आंदोलनाला हिंसक वळण, लक्ष्मी रोडवर पीएमटीच्या काचा फोडल्या 

लातूर : वासनगाव फाटा येथील ठिय्या आंदोलनात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी बैठक दिली आहे. अनेक ठिकाणी जागरण गोंधळ, भारुडे, पोवाडे असे कार्यक्रमही होत आहेत. आंदोलकांनी रस्‍त्यावर खाट टाकून बैठक दिली . मराठा आमदारांच्या निष्क्रियतेवर जीवंत देखावे करुन आंदोलकांनी त्यांची खदखद व्यक्त करीत आहेत. शहर व जिल्ह्यात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

गजबजलेल्या बाजार समितीत शुकशुकाट दिसून आला. भाजी फळबाजार, हातगाडेवाले, अॅटो युनियन, अशा विविध संघटनांनी बंदला प्रतिसाद दिला. रेणापूर, चाकूर, उदगीर, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर, जळकोट, देवणी, निलंगा औसा आदी तालुक्यातही उत्सफूर्त जनआंदोलन होत आहे. 
 

मराठा क्रांती मोर्चाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट बंदचे परिणाम राजधानी मुंबईमध्ये जाणवले. जीवनदाहिनी असलेली लोकलमध्ये तुरळक प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मुंबई एपीएमसीमधील घाऊक बाजार पुर्णपणे बंद आहे. 

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून स्पष्ट आदेश देण्यात आले असले, तरी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने एसटी सेवा पूर्णपणे खंडित केली आहे. जवळपास १९ हजार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

लातूर : रेणापूर पिंपळफाटा येथे लातूर ग्रामिण चे आमदार त्र्यंबक भिसे यांच्या गाडीवर आंदोलनकाची दगडफेक, गाडीच्या काचा फुटल्या, कुणालाही इजा नाही
 

जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सामनेर गावात अर्धनग्न आंदोलन करून जळगाव आणि मालेगावकडे जाणारा सामनेर बायपास महामार्ग रोखण्यात आला 

बुलढाणा :  महामार्ग रोखल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा 

रायगड : अलीबागमध्ये मराठा क्रांती मोर्चाला प्रारंभ

मुंबई : सार्वजनिक वाहतुक पुर्णपणे बंद 

मुंबई :  मुंबई सेंट्रल, परेल तसेच दादर स्थानकातून सुटणाऱ्या एसटी बसेस पूर्णपणे बंद 

नाशिक : चांदवडला अनोखा रिंगण सोहळा करीत सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मुंबई-आग्रा महामार्गवर आंदोलन

सांगली : विटा शहरातून दुचाकी रॅली, दुकाने बंद, आंदोलनाला मोठा प्रतिसाद

नगर : जामखेड शहरातील खर्डा चौकात बैलगाड्यांसह आंदोलनाला सुरवात, खर्डा, जवळा, अरणगाव व जामखेड शहरात सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत चक्काजाम

औरंगाबाद : हासुल सांगवी बायपासवर टायर जाळले, आंदोलन सुरू

रायगड : महाड बसस्थानकासमोरील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सकल मराठा समाजाच्या संयोजकांकडून रास्ता रोकोस प्रारंभ

पुणे : शहराच्या मध्यवस्तीतील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्त्यावरील सर्व दुकाने बंद 

सोलापूर : बोंडलेत पुणे-पंढरपूर राष्‍ट्रीय महामार्ग क्र. ९६५ वर चक्‍काजाम

रायगड : महाड शहरातील मुख्य बाजारपेठेसह महाड बसस्थानक तसेच राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक शंभर टक्के बंद.

नाशिक : कळवणमध्ये बस सेवा बंद, ठिय्‍या आंदोलन सुरू

उस्‍मानाबाद : परंडा, येरमाळामध्ये सकाळपासून शांततेत बंद

महाराष्‍ट्र बंदमुळे ठाण्यात कडकडीत पोलिस बंदोबस्त; शाळा, कॉलेज देखील बंद

औरंगाबाद : सिडको चौकात रास्‍तारोको, ठिय्‍या आंदोलन

पालघर : नालासोपार्‍यात बंदला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद,  पेट्रोल पंप, दुकाने बंद, रिक्षा परिवहन सेवा सुरू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील सर्वच गावांत आंदोलक रस्‍त्यावर, रास्‍ता रोको करून आंदोलन सुरु

रायगड : पोलादपूरमध्ये कडकडीत बंद; दुकाने, हॉटेल व्याससायिक बंदमध्ये सहभागी, पोलिस प्रशासन सज्‍ज

औरंगाबाद शहरातील सर्वात मोठ्या जाधववाडी कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीत कडकडीत बंद

सोलापूर : माळशिरसमधील पिलीव येथे बंद नाही. शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर. 

औरंगाबाद : औरंगाबाद-जळगाव रस्‍त्यावर जाधववाडी मार्केटजवळ उभी असणारी खासगी बस पेटविली, रस्‍त्यावर अज्ञातांनी टायर जाळले. 

औरंगाबाद - नगर महामार्गावर बजाज गेट येथे रास्‍ता रोको

सोलापुरात पहाटेपासून आंदोलनास सुरुवात; माळशिरस तालुका बंद

अत्यावश्यक सेवांना बंदमधून वगळले 

नागपूर : मराठा क्रांती मोर्चा बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व खासगी शाळांना सुट्टी जाहीर

हिंगोली : शाळा, महाविद्यालये बंद राहणार 

ठाणे, पुणे व औरंगाबादमध्ये शाळा बंद राहणार 

लातूरमध्ये मराठा आंदोलकांकडून मध्यरात्रीपासूनच रास्तारोको 

नांदेड, जालना, परभणी, अकोलामध्ये बंद