Mon, May 27, 2019 07:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्र बंद मुंबई : लोकल थंडावल्या

महाराष्ट्र बंद मुंबई : लोकल थंडावल्या

Published On: Aug 09 2018 12:40PM | Last Updated: Aug 09 2018 2:16PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

मराठा क्रांती मोर्चाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट बंदचे परिणाम राजधानी मुंबईमध्ये जाणवले. जीवनदाहिनी असलेली लोकलमध्ये तुरळक प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. मुंबई एपीएमसीमधील घाऊक बाजार पुर्णपणे बंद आहे. 

 मुंबई LIVE अपडेट 

पालकांनी मुलांना शाळेत पाठवले नाही, काही ठिकाणी शाळांनी सुट्टी दिली आहे

नवी मुंबई मध्ये सर्वत्र शांतता असून रिक्षा, बसेस व ट्रेन सुरळीत आहे कोपरखैरणे इथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक व पोलीस तैनात

वाशी रेल्वे स्थानकाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात

लोकलला तुरळक प्रमाणात प्रवाशी

मुंबई एपीएमसी घाऊक बाजार बंद

नवी मुंबईमधील कळंबोली येथील संवेदनशीलता लक्षात घेत पनवेल डिसीपी अशोक दुधे पोलिसांना मार्गदर्शन करण्यासाठी  हजर

नवी मुंबईमधील सकल मराठा समाजाच्या वतीने पनवेल तहसील कार्यालया समोर आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलनास सुरवात.