Sun, Jul 05, 2020 21:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'नवी मुंबईतील वाहनधारकांना वाशी टोलनाका मुक्त करावा'(व्हिडिओ)

'नवी मुंबईतील वाहनधारकांना वाशी टोलनाका मुक्त करावा' (व्हिडिओ)

Published On: Dec 22 2017 4:14PM | Last Updated: Dec 22 2017 4:14PM

बुकमार्क करा

नवी मुंबई: प्रतिनिधी 

सायन-पनवेल महामार्गावर खारघर टोलनाका येथून पनवेलकडे आणि वाशीकडे येणार्‍या स्थानिक वाहनांना टोलमुक्ती देण्यात आली आहे. या टोलनाक्यावर स्थानिक वाहनचालकांकडून टोल आकारणी केली जात नाही. या धर्तीवर नवी मुंबईतील वाहनधारकांना वाशी टोलनाका मुक्त करावा, असा मुद्दा आज विधानसभेत आमदार मंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला. 

सीबीडी बेलापूरपासून वाशी शहरातील चारचाकी हजारो वाहने रोज मुंबईत जातात. यामुळे टोल मुक्तीसाठी म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे  पत्रव्यवहार केल्याचे म्हटले.