Mon, Aug 19, 2019 04:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खुल्या प्रवर्गातील मुलांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती 

खुल्या प्रवर्गातील मुलांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती 

Published On: Aug 21 2018 2:43PM | Last Updated: Aug 21 2018 2:42PMमुंबई : प्रतिनिधी 

खुल्या प्रवर्गासह इतर मागासवर्गीय आणि विजा-भज, विमाप्र या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज मंत्रालयात झालेल्‍या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत माजी पंतप्रधापन अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी या बैठकीत अनेक महत्‍त्‍वपूर्ण निर्णय घेण्यात आले. 

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)
सेंद्रीय शेती-विषमुक्त शेती या राज्य पुरस्कृत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन स्थापन्यास मान्यता.

राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेत विभागीय जिरॅयाट्रिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय.

मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेच्या धोरणात सुधारणा.

केंद्र शासनाच्या ॲग्रिकल्चर प्रोड्यूस अँड लाईव्हस्टॉक मार्केटिंग (promotion and Facukutatuin) कायदा-2017 (Model Act) प्रमाणे महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम-1963 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.

अकोला येथील महाबीज आणि पुणे येथील राष्ट्रीय बीज निगम यांच्या बीजोत्पादक शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती आधारित दर व शासन घोषित किमान आधारभूत किंमत यामधील फरकाची रक्कम देण्यासाठी नवीन योजना सुरू.