Thu, Jul 18, 2019 00:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महापरिनिर्वाण दिनानंतर अनुयायी, मनपाकडून मुंबईची स्‍वच्छता

महापरिनिर्वाण दिनानंतर अनुयायी, मनपाकडून मुंबईची स्‍वच्छता

Published On: Dec 07 2017 4:52PM | Last Updated: Dec 07 2017 4:52PM

बुकमार्क करा

मुंबई  : प्रतिनिधी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त मुंबई चैत्यभूमी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गर्दीमुळे ठिकठिकाणी कचरा साचला होता. या कचर्‍यांचे ढीग काढून महापालिकेने अवघ्या दहा तासात परिसर स्वच्छ केला. या स्‍वच्छता मोहिमेमध्ये आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

दरम्यान आतापर्यंत 70 टन कचरा उचलण्यात आला असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.