Wed, Jul 17, 2019 19:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाड एसटी आगार दुसर्‍या दिवशीही बंद

महाड एसटी आगार दुसर्‍या दिवशीही बंद

Published On: Jun 09 2018 10:50AM | Last Updated: Jun 09 2018 10:50AMमहाड प्रतिनिधी  

राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या मनमानी तसेच कामगारांच्या वेतनवाढी बाबत फसवणूक केल्याचा आरोप करीत कामगार संघटनांनी संपूर्ण राज्यात कालपासून संप सुरू केला आहे.  संपाच्या दुसर्‍या दिवशी आज महाड एस.टी. आगार पूर्णपणे बंद असल्याचे दिसून आले. सुमारे 106 कर्मचारी गैरहजरअसल्याची माहिती आगार व्यवस्थापक श्री कुलकर्णी यांनी दिली. खासगी शिवशाही गाड्यांच्या माध्यमातून स्थानकावर आलेल्या मुंबई पुणे मार्गावरील प्रवाशाची व्यवस्था करण्यात येणार असलयाचे त्यांनी स्पष्ट केले आहे .  

प्राप्त झालेल्या माहितीनुसार काल संपाच्या पहिल्या दिवशी सुमारे एकशेसहा कर्मचाऱ्यांनी ड्युटीवर न जाऊन या संपामध्ये सहभाग घेतल्याचे समजते. महाड आगारांमध्ये चालक, वाहक, विना वाहक चालकांची संख्या ही सुमारे 280 असुन काल 106 कर्मचारी गैरहजर होते. 

कर्मचार्‍यांशी संघटनेच्या आदेशानुसार संप बेमुदत सुरू ठेवणयाची आमची तयार झाली असून आता लढा हा शेवटपर्यंत देणार असल्याची कामगारांच्या वतीने सांगण्यात आले आहे. आगार व्यवस्थापक श्री कुलकर्णी यांनी प्रवाशांच्या सोयीकरिता खासगी शिवशाही गाड्यांची मदत घेण्यात येणार रस्त्याचे सांगितले आहे . 

संपाच्या पहिल्या दिवशी आठ जून रोजी डेपोतून रिझर्व्हेशन केलेल्या प्रवाशांना सुमारे एक लक्ष रुपये रिफंड केल्याची माहिती आगार व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. आज महाड तालुक्यातील वारंगी या गावी गाडी सोडण्यात आली असून मुंबईतून काल रात्री पाच शिवशाही गाड्या प्रवाशांना घेऊन महानगरात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, खासगी गाडय़ातून प्रवाशांना सोडवण्याकरता आवश्यकता भासल्यास पोलिस कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येइल असे आगार व्यवस्थापक श्री कुलकर्णी यांनी सांगितले आहे . एसटी महामंडळाकडून कालच्या संपाच्या पार्श्वभुमीवर निलंबित करणयात आलेलया कामगार व अधिकारी वर्गामध्ये महाड आगारातील एकही कर्मचारी व अधिकारी नसल्याची माहिती चौकशीअंती प्राप्त झाली आहे. 

एकूणच मुंबई गोवा महामार्गावरील चोवीस तास गजबजलेला असणारा महाड एसटी आगारामध्ये संपूर्णपणे शुकशुकाट निर्माण झाल्याचे दिसून येत असून प्रवासी वर्गामधून गाड्यांच्या खासगीकरणाचा वापर करून आपापल्या कामावर जात असल्याचे आढळले आहे.