महाडः प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. आज पहाटे महाड शहरालगतच्या गांधारपाले गावाजवळ कंनटेनर व रिट्स कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात कार चालक ठार झाला. वाहतूक पोलिस शाखेतर्फे याबाबत माहिती देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, रिट्स कार (एमएच ०५ बी.जे २५८६) ही मुंबईहून कणकवलीकडे जात असताना गोव्याकडून मुंबईकडे येणाऱ्या टँकरने (एम.एच ४६ ए ६६७१) कारला मागील बाजूने जोरदार धडक दिली. ठोकरीमध्ये कारचालक योगेश दिगंबर खोर्जुवेकर (वय २८) रामालवण हा गंभीर जखमी झाला.
जखमी कारचालकाला महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करत आहेत.