Tue, Mar 19, 2019 09:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मदुराई एक्स्प्रेसचे डब्बे खंडाळा घाटात घसरले

मदुराई एक्स्प्रेसचे डब्बे खंडाळा घाटात घसरले

Published On: Jul 06 2018 7:40AM | Last Updated: Jul 06 2018 8:48AMठाणे /लोणावळा : अमोल कदम

 मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसकडून मदुराईच्या दिशेने जाणारी डाऊन ११०४३ मदुराई एक्सप्रेस या गाडीला पहाटे २.४० वाजण्याच्या सुमारास मध्य रेल्वेच्या खंडाळा रेल्वे स्थानकाच्या जवळ डाऊन लाईनवर अपघात झाला. खंडाळा घाट चढण्यासाठी अधिकची ताकत मिळावी यासाठी या एक्सप्रेसला कर्जत रेल्वे स्थानकात मागील बाजूस गाडीवर ढकलणारे बंकर इंजिन जोडण्यात आले होते. मदुराई एक्सप्रेस खंडाळा रेल्वे स्थानकात शिरत असतानाच मागून गाडीला ढकलणाऱ्या बंकर इंजिनचा जास्तीचा रेटा गाडीला बसला गाडीची मागील भोगीमध्ये हे इंजिन घुसले. यामुळे या भोगीचं मोठं नुकसान झालं मात्र सुदैवाने मागच्या भोगीमध्ये लगेज ठेवण्याची जागा असल्याने प्रवाशांपर्यंत हा धक्का पोचला नाही. त्यामुळे यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही किंवा कोणी जखमी देखील झाले नाही. अपघाताची खबर मिळताच लोणावळा पोलिस, रेल्वेचे कर्मचारी, पोलीस दल आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. 

अपघातग्रस्त बोगी आणि त्यापुढील अजून एक बोगी घटनास्थळी ठेऊन मदुराई एक्सप्रेसला पुढे काढण्यात आले आहे. आणि सध्या अपघातग्रस्त बोगी तसेच बंकर इंजिन बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

घाटात डाऊन लाईन, अप लाईन आणि मिडल लाईन आशा एकूण तीन रेल्वे लाईन असल्याने डाऊन लाईन बंद करून मिडल लाईनने रेल्वेची वाहतूक सुरू ठेवल्याने रेल्वे वाहतुकीवर कोणत्याही स्वरूपाचा परिणाम झाला नाही.

खंडाळा घाटात आज पहाटे मधुराई एक्‍स्प्रेस (११०४३) चे डबे पहाटे २ वाजून ५० मिनिटांनी डबे रूळावरून घसरले. मेडिकल व्हॅन, रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या घटनेमुळे आज रद्‌द करण्यात आलेल्या गाड्या पुणे- मुंबई सिहगड एक्सप्रेस, पुणे - मुंबई प्रगती एक्सप्रेस, पुणे -कर्जत व कर्जत पुणे शटल, भुसावळ- पुणे एक्सप्रेस व मुंबई - पुणे, पुणे- मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या दुर्घटनेत कुणीही जखमी नसल्याचे रेल्वे अधिकारी सांगितले. परंतु या अपघातामुळे मध्य रेल्वे मार्गावरील  लोकल वाहतूक विस्कळीत झाली असून लोकल नियमित वेळेच्या पाच मिनिटे उशिरा धावत आहेत. रुळावरून घसरलेल्या एक्स्प्रेसच्या डब्यांना बाजूला करण्याचे काम रेल्वे कामगारांनी क्रेनच्या साहाय्याने सुरू केले असून एक लाईन  सुरू करण्यात आली आहे.