Wed, Aug 21, 2019 02:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माधुरीने नाकारली सरकारची ऑफर

माधुरीने नाकारली सरकारची ऑफर

Published On: Jun 11 2018 3:43PM | Last Updated: Jun 11 2018 3:43PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

भारतीय जनता पक्षाच्या 'संपर्क फॉर समर्थन' मोहिमेंतर्गत पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सेटिब्रिटींच्या भेटी घेण्याचा धडाका लावला आहे. यातच त्यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षितची भेट घेतली. परंतु, या भेटीनंतर चर्चा रंगली ती माधुरीच्या राजकारणातील प्रवेशाची. परंतु, या चर्चेला माधुरीने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान माधुरीने राजकीय पदर्पणाचा केला खुलासा,  मी एक कलाकार असून माझा राजकारणाशी संबंध नाही. मला राजकारणात रसही नाही. त्यामुळे राजकारण प्रवेशाचा प्रश्नच येत नाही आणि मी राजकारणात येण्याचा कधी प्रयत्‍नही करणार नाही. सरकारने पाठिंब्यासाठी पुढाकार घेऊन भेटीचा कार्यक्रम आखला आहे. त्या अंतर्गत ते इतरांनाही भेटले आहेत. त्या दिवशी ते फक्‍त मलाच नाहीतर रतन टाटा यांनाही भेटले. ही मुलाखत केवळ कार्यक्रमाचा भाग होती, असे माधुरीने सांगितले. 

दरम्यान, माधुरी दीक्षितचा बकेटलिस्ट चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शीत झाला असून माधुरी सध्या चित्रपटाच्या यशाच्या सेलिब्रेशमध्ये बिझी आहे.