Mon, Mar 25, 2019 04:56
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शहापूरनजीक लक्झरी-बोलेरो धडकेत ३ महिला ठार; ५ जखमी

शहापूरनजीक लक्झरी-बोलेरो धडकेत ३ महिला ठार; ५ जखमी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कसारा/मोखाडा : वार्ताहर 

मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर येथील गोठेघर पुलाजवळ लक्झरी बस आणि बोलेरो गाडीच्या भीषण अपघातात तीन महिलांचा मृत्यू तर 5 जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. अपघातात बोलेराच्या मागील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. सुरेखा पाटील (48), प्रमिला पाटील (40) मयुरी पाटील अशी मृतांची नावे असून, मृत मयुरी या मोखाडा तालुक्यातील कोशीमशेत येथील विद्यमान सरपंच होत्या. 

मिळालेल्या माहितीनुसार, मोखाडा तालुक्यातील कोशींबशेत येथील रहिवासी लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी बोलेरोतून उल्हासनगर येथे जात होते. गोठेघर पुलाजलवळ त्यांची गाडी आली असता बोलेरो चालकाने नाशिक येथून मुलीच्या लग्नाचे वर्‍हाड घेऊन मुंबईकडे  जाणार्‍या लक्झरी बसला ओव्हरटेक करून अचानक ब्रेक मारला. त्यामुळे भरधाव वेगाने मागून येणार्‍या बसने बोलेरो गाडीला जोरदार धडक दिली. 

यात प्रमिला पाटील, मयुरी पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुरेखा पाटील यांना ठाणे येथील रुग्णालयात जखमी अवस्थेत नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. भास्कर जनार्दन कोरडे (49), अश्विनी युवराज पाटील (20), युवराज शंकर पाटील (45), कमल पांडुरंग फाळके (52), रोशन युवराज पाटील (28) आदी जखमी झाले. जखमींना शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालय आणि तेथून ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची शहापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Tags : mumbai news, luxury Bolero, accident, 3 women, killed,  Shahapur, 


  •