Wed, Jan 23, 2019 12:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टिटवाळा : प्रियकराला ठार मारून प्रेयसीवर बलात्‍कार करणारा ताब्यात

टिटवाळा : प्रियकराला ठार मारून प्रेयसीवर बलात्‍कार करणारा ताब्यात

Published On: Mar 11 2018 4:15PM | Last Updated: Mar 11 2018 4:15PMटिटवाळा : प्रतिनिधी

कल्याण तालुक्यातील आणे भिसोळ जवळील चिंचपाडा-नालंबी या गावालतगच्या प्रेयसीसोबत बोलत बसलेल्या युवकाला लुटारूने गोळ्या झाडून ठार करून त्याच्याबरोबर असलेल्या युवतीवर बलात्‍कार केला होता. बलात्‍कार करून तो युवक फरार झाला होता. त्याला ठाणे ग्रामीण पोलिसांनी ६ दिवसात जेरबंद केले आहे.

कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि. ५ रोजी रात्री ८ वाजता चिंचपाडा-नालंबी या  गावाजवळ असलेल्या टेकडीवर गणेश दिनकर हा तरुण आपल्या प्रेयसीसोबत गप्पा मारत बसला होता. यावेळी त्या ठिकाणी लुटमार करण्याच्या उद्देश्याने आलेल्या लुटारूने या दोघांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. दुचाकीची चावी देखील मागितली. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत त्या तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार केला. यावेळी प्रियकर विरोध करायला गेलेला असताना लुटारूने बंदुकीने त्या तरुणीच्या प्रियकरावर गोळी झाडली यामध्ये प्रियकर जागीच ठार  झाला होता. या घटनेनंतर पळून गेलेल्या त्या लुटारूच्या  शोधात पोलिसांची ४ पथके रवाना झाली होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी हा उल्हासनगर येथील एका लॉजमध्ये असल्याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्‍या आहेत. संजय नरोडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मुळचा जालना जिल्ह्यातील तालुका आंबड गोंदी या भागतील असून त्याच्यावर या अगोदरही लुटमारी केलेल्या गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांच्या इतर चौकशी नंतर आरोपीला न्यायालयात हजर केले जाणर आहे.