Thu, Jun 27, 2019 15:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रियकराची हत्या करून प्रियसीवर बलात्कार  

प्रियकराची हत्या करून प्रियसीवर बलात्कार  

Published On: Mar 05 2018 11:07PM | Last Updated: Mar 05 2018 11:08PMअंबरनाथ : प्रतिनिधी

प्रियकराची हत्या करून प्रियसीवर बलात्कार  केल्‍याची घटना चिंचपाडा-नालंबी गांव रस्त्यावरील टेकडीवर घडली आहे. रात्री ८ च्या  सुमारास तरुण आपल्या प्रियसीसोबत दुचाकीवर बसून बोलत होता. यावेळी तेथून आलेल्या एका तरुणाने त्या दोघांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. त्यानंतर प्रियकराच्या छातीवर बंदुक ठेवत त्याला घाबरविले. तसेच त्या तरुणाच्या प्रियसीवर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यास प्रियकराने विरोध करताच बंदुकधारी लुटारुने त्या तरुणावर गोळीबार केला. त्यात तरुणाचा जागिच मृत्यू झाला.

अंबरनाथ पश्चिम भागातील चिंचपाडा ते नालंबी हा रस्ता रात्रीच्या वेळी सामसुम असतो. हा रस्ता पुढे टिटवाळा रस्त्याला मिळतो. शहापूर अस्नोली गावात राहणारा तरुण आपल्या प्रियसीसोबत अंबरनाथच्या नालंबी  येथील रस्त्याच्या बाजुला बसला होता. हत्‍या झालेला तरूणाचे वास्तव्य अंबरनाथला होते. तो आपल्‍या प्रियसीसोबत बसला असताना एक करुण मागुन आला. त्याने बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैशांची आणि बुलेटची चावी मागितली. त्यानंतर त्‍याच्या प्रियसीवर बलात्कार करण्याचा प्रयन्त केला. त्याला विरोध करण्यासाठी तो पुढे सरसावताच त्या लुटारुने त्याच्यावर गोळी झाडली. त्यानंतर त्या तरुणीलाही बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार करुन तेथून पळून गेला असे पीडित मुलीने सांगितले. 

आरोपी पळून गेल्यानंतर त्या तरुणीने येणा जाणाऱ्यांकडे मदत मागितली. त्यानंतर गावातील काही नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटना टिटवाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेली असला तरी अंबरनाथ पोलिसांनी प्राथमिक तपास करुन गुन्हा त्यांच्याकडे वर्ग केला आहे. पुढील तपास टिटवाळा पोलिस करीत आहेत.