Thu, Apr 25, 2019 07:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › म्हाडाचा  दिवाळी बंपर

म्हाडाचा  दिवाळी बंपर

Published On: Aug 26 2018 1:45AM | Last Updated: Aug 26 2018 1:39AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईकरांना मुंबईतच म्हाडाचे घर घेण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात म्हणजेच दिवाळीत म्हाडाच्या एक हजार घरांसाठी सोडत निघणार आहे. यात वडाळा येथे सर्वाधिक 278 तर मुलुंडमधील269 घरांचा समावेश असेल.

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 9 हजार 18 घरांची लॉटरी शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वांद्रे येथील गुलझारीलाल नंदा सभागृहात काढण्यात आली. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी ही घोषणा केली. मुंबई मंडळाकडून सुमारे 1 हजार घरांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार असून मुंबईच्या विविध भागांमध्ये ही घरे असणार आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या लॉटरीत पंतप्रधान आवास योजनेची घरे नसतील. मात्र नव्वद टक्के घरे अल्प, मध्यम उत्पन्न गटातील असतील. म्हाडाकडे मुंबईत घरे बनवण्यासाठी आता पुरेशी जागा नाही. मात्र येत्या दोन वर्षात एसआरए, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जास्तीत जास्त परवडणारी घरे देणार असल्याचे प्रकाश महेता यांनी यावेळी जाहीर केले.