होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केवळ १० रुपयांत करा एसी लोकलचा प्रवास

केवळ १० रुपयांत करा एसी लोकलचा प्रवास

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा     

1 जानेवारीपासून मुंबईत सुरु होणार्‍या वातानुकुलीत उपनगरीय रेल्वेचे प्रवास भाडे सर्वसामान्यांना परवडणारे असावे याचा विचार करत पश्‍चिम रेल्वेने तिकीटाचे दरपत्रक तयार केले असून ते पश्‍चिम रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. यानुसार पहिल्या पाच किलोमीटरसाठी 10 रुपये भाडे आकारण्यात येणार असून जास्तीत जास्त 60 किलोमीटरसाठी 85 रुपये इतका तिकीट दर असणार आहे.

पश्‍चिम रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर तिकीट दरपत्रक रेल्वे बोर्डाकडे अंतीम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. सदर वातानुकुलीत रेल्वेच्या मासिक पासाबद्दल अद्याप माहिती नसली तरी सध्या लोकलच्या फर्स्ट क्‍लासने प्रवास करणारे प्रवासी या एसी लोकलमधून प्रवास करु शकणार असल्याचे पश्‍चिम रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. एसी लोकलचे प्रस्तावीत तिकीट दर हे सर्वसामान्यांना निश्‍चितपणे परवडणारे असतील, असे पश्‍चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी सांगितले.