Sun, Aug 25, 2019 12:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › mumbai rain Live : कोसळणार्‍या पावसाने 'तुंबई'

mumbai rain Live : कोसळणार्‍या पावसाने 'तुंबई'

Published On: Jul 10 2018 9:00AM | Last Updated: Jul 10 2018 2:16PMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईत आजही पावसाचा जोर कायम आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. वसई- विरार रेल्वे वाहतूक ठप्प आहे. कल्याण शीळफाटा मार्गावरही वाहतूक कोंडी आहे. लांबपल्याच्या 12 एक्स्प्रेस उमरगाव जवळ थांबल्या आहेत. यामुळे प्रवाशी अडकले आहेत. 

सायन पनवेल महामार्गावरही कंळबोली उड्डाणपूलाखाली पाणी साचले आहे. कामोठे उड्डाण पूला जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ठाणे- अंबरनाथ दरम्यान दिम्यागतीने लोकल सेवा सुरू आहे. हार्बर मार्गावर लोकल उशिराने सूटत आहेत.

मुंबईची लोकल वहातूक काही ठिकाणी ठप्प पडली आहे. व हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा दिल्याने डबेवाले संघटनेने आज मुंबईत डबे पोहचवण्याचा व्यवसाय बंद ठेवला आहे.

डबेवाल्यांना सकाळी ७ वाजताच घरातून डबे न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे प्रवक्‍ता सुभाष तळेकर यांनी सांगितले आहे.

नालासोपाराला पाणी भरल्यामुळे उपनगरीय वाहतूक धिम्या गतीन चालू आहे. नालासोपाराला विरार-चर्चगेट लोकल अर्धा तासापासून उभी आहे. विरारला पाच नंबरवर भूज एक्सप्रेस आणि सहावर जामनगर उभी आहे. लोकशक्ती नारींगी फाटकात उभी आहे. 

मागील एक तासात एकच लोकल आता गेली आहे. मेल थांबवण्यात आल्या आहेत. आता विरारला सूचना देण्यात येतात की, नालासोपाराला पाणी भरल्याने पुढील सूचना मिळेपर्यंत लोकल धावणार नाहीत.

मुसळधार पावसामुळे बोरिवली ते विरार रेल्‍वे पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नालासोपाऱ्यासह काही स्टेशनवरील ट्रॅकवर पाणी आल्याने बोरिवलीपासून विरार अप-डाऊन वाहतूक बंद करण्यात आली आहे. बोरिवलीपासून चर्चगेटपर्यंत धावणार्‍या लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत. तसेच मध्य आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूकही  पंधरा ते वीस मिनिटं उशीराने धावत असल्याने मुंबईकरांचे वेळापत्रक बिघडले आहे.

अपडेट : 

नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भरावामुळे पनवेल परिसरातील ग्रामीण भागात.. पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. 

मुसळधार पावसामुळे विरारमध्ये दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू

मुंबईतील शाळांना आज सुट्टी नाही; अतिवृष्‍टीचा इशारा नसल्याने निर्णय : शिक्षणमंत्री विनोद तावडे

ठाणे जिल्हा परिषद शाळांना सुट्टी जाहीर